ब्युटी विथ ब्रेन! 'ही' अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे पायलट, भूमिकेसाठी वकिलीचंही घेतलं शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:57 IST
1 / 7सौंदर्य आणि हुशारी अशा दोन्हीमध्ये आघाडीवर असलेल्या अनेक अभिनेत्री आहेत. अशीच एक अभिनेत्री जी पाटलटही बनली. आज ती अभिनेत्री ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 / 7ही आहे अभिनेत्री गुल पनाग. २००३ मध्ये आलेल्या 'धूप' सिनेमातून तिने करिअरला सुरुवात केली होती. नंतर 'डोर' सिनेमातून तिने लक्ष वेधून घेतलं. नुकतीच ती 'फॅमिली मॅन' सीरिजमध्येही दिसली.3 / 7गुल पनाग सर्टिफाइड पायलट आहे. तिच्याजवळ कमर्शियल पायलटचं लायसन्स आहे. इतकंच नाही तर तिला बाईक चालवण्याचीही आवड आहे.4 / 7१९९९ साली गुल पनागने मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. मात्र यामुळे तिला ग्लॅमरस भूमिकाच ऑफर होऊ लागल्या. गंभीर भूमिकांमध्ये तिला कास्ट केलं जात नव्हतं. हीच गोष्ट तिच्या करिअरमध्ये अडचणीची ठरत होती.5 / 7'गुड बॅड गर्ल' या सीरिजमध्ये गुल वकिलाच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेसाठी तिने खरोखरंच वकिलीचं शिक्षण घेतलं. कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे असं तिचं म्हणणं होतं.6 / 7२०११ मध्ये गुलने पायलट ऋषी अत्तारीसोबत लग्न केलं. २०१८ मध्ये तिने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव निहाल आहे.7 / 7गुल सुंदर, फिट आणि ताकदीची अभिनेत्री आहे. म्हणूनच तिला 'ब्युटी विथ ब्रेन' म्हटलं जातं.