Join us  

'बाळूमामा' फेम अभिनेता सुमीत पुसावळेनं बांधली लग्नगाठ, पाहा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 1:25 PM

1 / 8
मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नसराई सुरू आहे. डिसेंबर महिन्यात अक्षया देवधर-हार्दीक जोशी, आशय कुलकर्णी-सानिया गोडबोले यांच्यानंतर काल अभिनेता सुमीत पुसावळेनेदेखील विवाह बंधनात अडकला आहे.
2 / 8
बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale) चा बुधवारी १४ डिसेंबर रोजी विवाह पार पडला.
3 / 8
सुमीत पुसावळे याने मोनिकासोबत सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.
4 / 8
लग्न मंडपात लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटोदेखील समोर आले आहेत.
5 / 8
सांगोला येथे विवाहसोहळा अगदी थाटमाट पार पडला असून या लग्नाला त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
6 / 8
तर मराठी सेलिब्रिटींनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.
7 / 8
अभिनेता सुमीत पुसावळे याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. लागिर झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे.
8 / 8
बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.
टॅग्स :बाळूमामाच्या नावानं चांगभलं