Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळा आयुष दरवर्षी करतो अय्यप्पा स्वामींचं ४० दिवसांचं व्रत, शबरीमाला मंदिरात आला दैवी अनुभव, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:53 IST

1 / 11
अभिनेता आयुष संजीव साळुंखे हा नुकतंच 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात सहभागी झाला होता. पण, त्याचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास महिन्याभरातच संपला.
2 / 11
आयुष सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अलिकडेच आयुषने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यानं अध्यात्मावर भाष्य केलं. आयुषने तो पुर्वी मूर्तीमध्ये देवत्व मानत नव्हता, असे कबूल केले. मात्र, शबरीमालाच मंदिरात घडलेल्या एका चमत्कारिक घटनेने त्याचे विचार पूर्णपणे बदलून टाकल्याचं आयुषनं सांगितलं.
3 / 11
मराठमोळ्या आयुषची अय्यप्पा स्वामींवर प्रचंड श्रद्दा आहे. प्रामुख्याने दाक्षिणात्य लोकांमध्ये केले जाणारे अय्यप्पा स्वामींचे उपवास आयुष संजीव दरवर्षी न चुकता करतो. ४० दिवस आणि अनेक नियम पाळून तो हे उपवास करतो. मूर्तीमध्ये देवत्व न मानणाऱ्या आयुषला शबरीमालाच्या मंदिरात आलेला दैवी अनुभव त्यानं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
4 / 11
आयुषनं सांगितलं की, 'माझं शेड्यूल वर्षभर ठरलेलं नसतं. कधी उशिरा झोपतो, कधी लवकर उठतो. त्यामुळे वर्षभर शिस्त पाळणं जमत नाही. म्हणून वर्षातील हे चाळीस दिवस मी स्वतःसाठी राखून ठेवतो. हा माझा वर्षभराचा डिटॉक्स असतो. ते म्हणजे अय्यप्पा स्वामींचे ४० दिवस दिवसांचे उपवास'.
5 / 11
आयुष म्हणाला, 'मी शबरीमाला मंदिरात दरवर्षी जातो. माझे बाबा जायचे. आम्ही दाक्षिणात्य नाही आहोत. पण, माझ्या बाबांचे जे बॉस होते, जे साउथ इंडियन होते. तर त्यांना सोबत म्हणून माझे बाबा त्यांच्याबरोबर जायचे. तर बाबांच्या बॉसचं निधन झाल्यानंतर माझे बाबा एकटे चालले होते, तर मी त्यांच्यासोबत गेलो'.
6 / 11
आयुषनं सांगितलं की, 'तो ४० दिवसांचा प्रवास खूप सुंदर आहे. म्हणजे त्या प्रवासमागे मागे खरंच विज्ञान आहे. म्हणजे मी विज्ञानाशिवाय कुठल्याच गोष्टीवर सहज विश्वास ठेवत नाही. तर तुम्ही त्या प्रवासामागचं विज्ञान पाहिलं, तर तो प्रवास अगदी योजनाबद्ध असा आहे'.
7 / 11
४० दिवसांमध्ये पाळल्या जाणाऱ्या नियमांमागे असलेलं विज्ञान त्यानं सांगितलं. तो म्हणाला, 'म्हणजे चप्पल का नाही घालायची, तर पायांतील ॲक्युप्रेशर पॉईंट्स सक्रिय होतात. काळे कपडे परिधान करण्यामागचं कारण म्हणजे राग, द्वेष, अहंकार अशा अठरा वाईट गुणांविरुद्धचा तो बंड असतो. आपण व्रतामध्ये आहोत याची सतत आठवण राहावी म्हणून गळ्यात माळ परिधान करतो. सात्विक आहार, जमिनीवर झोप, ब्रह्मचर्य हे शरीराची अंतर्गत स्वच्छता करतं'.
8 / 11
पुढे तो म्हणाला, 'मी सर्वांना हेच सुचवेन की, आयुष्यात एकदा तरी हे ४० दिवसांचे उपवास करून पाहिले पाहिजेत. ही केवळ एक प्रथा नसून जीवन बदलून टाकणारी प्रक्रिया आहे. या ४० दिवसांच्या शिस्तीतून बाहेर पडल्यानंतर मला स्वतःमध्ये एक वेगळा, अधिक सकारात्मक आणि संयमी माणूस जाणवतो. त्या मंदिराचं सौंदर्य आणि तिथली ऊर्जा शब्दांत वर्णन करण्यापलीकडे आहे. तिथे लाखो भक्त श्रद्धेने येतात'.
9 / 11
आयुष सांगतो, 'माझं म्हणणं आहे की देव हा मंदिरात नसतो. तर देव हा मंदिरापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासामध्ये असतो. मी कधीच मूर्तीत देव शोधला नाही. माझ्यासाठी देव म्हणजे हे 'युनिव्हर्स' (ब्रह्मांड) होतं. एका ठराविक जागी देवाची एनर्जी असते, यावर माझा कधीच विश्वास नव्हता.
10 / 11
आयुषला मंदिरात आलेला दैवी अनुभवाबद्दल तो म्हणाला, 'मंदिरात मागे एक जागा आहे जिथे लोक डोकं टेकवून दर्शन घेतात. मी नेहमीप्रमाणे फक्त हात जोडत होतो, पण वडिलांनी आग्रह केला की तू पण डोकं टेकव. मी जसं माझं कपाळ त्या जमिनीला टेकवलं, तसं मला काहीतरी वेगळ्याच भावना जागृत झाल्या'.
11 / 11
आयुष म्हणाला, 'त्या क्षणी माझ्या डोक्यात विचारांचा पूर्ण 'शून्य' होता, पण अचानक माझ्या डोळ्यांसमोर माझ्या जवळच्या ५ लोकांचे चेहरे दिसू लागले. म्हणजे माझे आई-वडील, भाऊ, मित्र या सर्वांचे चेहरे मला लख्ख दिसू लागले. माझ्या संपूर्ण आयुष्याचा जणू एक 'टाईमलॅप्स' माझ्या नजरेसमोरून गेला. मला आयुष्यात आतापर्यंत किती काही मिळालं आहे, याची जाणीव झाली. मी कोणाकडे काही मागत नव्हतो, पण तरीही आपोआप माझ्या मनात सर्वांच्या कल्याणाचे विचार येऊ लागले आणि मी कमालीचा कृतज्ञ झालो'.
टॅग्स :मराठी अभिनेताकेरळशबरीमला मंदिर