Join us

प्यार किया तो डरना क्या? हातात हात घालून दिसले अर्जुन कपूर व मलायका अरोरा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 10:55 IST

अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांचे रिलेशनशिप आता पब्लिक झाले आहे. होय, कुटुंबाने हे रिलेशनशिप मान्य केल्यानंतर अर्जुन व मलायका आता खुल्लम खुल्ला एकत्र फिरताना दिसताहेत. अगदी हातात हात घालून

अर्जुन कपूरमलायका अरोरा यांचे रिलेशनशिप आता पब्लिक झाले आहे. होय, कुटुंबाने हे रिलेशनशिप मान्य केल्यानंतर अर्जुन व मलायका आता खुल्लम खुल्ला एकत्र फिरताना दिसताहेत. अगदी हातात हात घालून. होय, अलीकडे हे कपल हातात हात घालून दिसले. तेही मीडियाची व जगाची पर्वा न करता. यावेळी अर्जुन ब्लॅक जीन्स व टी-शर्टमध्ये होता तर मलायका ब्राऊन कलरच्या वनपीसमध्ये होती. निमित्त होते संजय कपूर यांनी दिलेल्या न्यू ईअर पार्टीचे. या पार्टीत मलायका व अर्जुन दोघांनीही हातात हात घालून एन्ट्री घेतली. केवळ इतकेच नाही तर एका फ्रेममध्ये अर्जुन मलायकाच्या खांद्यावर हात टाकून उभा असलेलाही दिसला.

यापूर्वी अर्जुन व मलायका एका प्री-ख्रिसमस पार्टीत दिसले होते. या पार्टीतही अर्जुन व मलायका दोघेही एकाच गाडीतून पोहोचले होती. या गाडीत मलायका अर्जुनच्या मागच्या सीटवर होती तर अर्जुन कपूर ड्राईव्ह करताना दिसला होता. अर्जुनच्या बाजूच्या सीटवर त्याचे काका संजय कपूर होते.

मलायकाची अर्जुनच्या कुटुंबासोबत वाढलेली ही जवळीक बघितल्यानंतर सर्वांना कळायचे ते कळून चुकले होते. आता या ताज्या फोटोने तर या कपलच्या रिलेशनशिपवर जणू शिक्कामोर्तब केले आहे. आता केवळ या नव्या वर्षांत या कपलच्या लग्नाची बातमी मिळण्याची देर आहे. अर्जुन व मलायका लवकरच लग्नबंधनात अडकणार, असे मानले जात आहे. कधी, ते बघूच.

अर्जुन तूर्तास ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात बिझी आहे. यात तो परिणीती चोप्रासोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. याशिवाय ‘तानाजी’ या पीरियड ड्रामा चित्रपटातही अर्जुन दिसणार आहे. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरसंजय कपूर