पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा ! वरुण-धवन साराच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 13:41 IST
1 / 8 सिनेमाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमांसने परिपूर्ण असा आहे. यात वरूण धवनचा कॉमिक टाइमिंग कमालचा दिसतो आहे. तर सारा अली खानदेखील कॉमेडी करताना क्यूट दिसते आहे. ट्रेलरमध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळते आहे. हा डेविड धवन यांचा ४५वा सिनेमा आहे.2 / 8 सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार वाट्टेल ते करायला तयार असतात. सध्याच्या युगात सिनेमाच्या प्रमोशनाला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावर सिनेमाचं कलाकार प्रमोशन करण्याची संधी सोडत नाहीत. 3 / 8 सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार वाट्टेल ते करायला तयार असतात. सध्याच्या युगात सिनेमाच्या प्रमोशनाला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावर सिनेमाचं कलाकार प्रमोशन करण्याची संधी सोडत नाहीत. 4 / 8 असाच काहीसा प्रकार सध्या वरूण धवन आणि सारा करतना दिसत आहेत. दोघेही 'कुली नंबर - १' सिनेमाच्या प्रमोशन करताना दिसतायेत. दोघांचे रोमँटीक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.5 / 8 शेअर केलेल्या फोटोत समुद्र किना-यावर घोडेस्वारी करताना दिसत आहेत. कधी रोमँटीक अंदाजात एकमेकांसह पोज देत आहेत. 6 / 8विशेष म्हणजे ट्रेलर रिलीज झाला तेव्हा अनेकांनी यावर नापसंतीच दर्शवली होती. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होईल तेव्हा कितपत रसिक पाहणे पसंत करतील हे तर वेळच ठरवेल.7 / 8 ट्रेलरमध्ये सारा वरुण धवनसह अंडर वाटर किस सीन देताना दिसते.हा सीन पाहून सैफ अली खाननेही यावर रिएक्शन दिली होती. संपूर्ण ट्रेलरमध्ये एकाच सीनची सर्वाधिक चर्चा रंगली होती. 8 / 8 साराचा चौथा सिनेमा आहे. बोल्ड अंदाजात ती रसिकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तिने कार्तिक आर्यनसह 'लव आजकल' सिनेमातही बोल्ड सीन दिले होते. पहिला सिनेमा 'केदारनाथ'मध्येही साराने सुशांतसह लिप किस सीन दिला होता.