Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : अनिता हसनंदानीच्या प्रेग्नंसीवर ट्रोलरने केली अशी कमेंट, पतीने दिले उत्तर

By रूपाली मुधोळकर | Updated: October 11, 2020 14:15 IST

1 / 9
टीव्ही स्टार अनिता हसनंदानी आई होणार म्हटल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्याआधी दीर्घ काळापासून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु होत्या. मात्र दरवेळी या सगळ्या अफवा तिने सांगितले होते. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक अनिताने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.
2 / 9
अनिता प्रेग्नंट असल्याचे कळताच, अनेक सेलिब्रिटी व चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र काही हेटर्सनी यावरूनही अनिला ट्रोल केले.
3 / 9
तू 50 वर्षांची होशील तेव्हा तुझा मुलगा 11 वर्षांचा असेन, काय फायदा? त्याला आपल्या आजीसोबत चालतानाही लाज वाटेल...., असे एका युजरने अनिताच्या प्रेग्नंसीच्या न्यूजवर कमेंट करताना लिहिले.
4 / 9
या युजरची ही कमेंट बघून अनेकांचा संताप अनावर झाला. अनिताचा पती रोहित रेड्डीही स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने या ट्रोलरला सणसणीत उत्तर दिले.
5 / 9
‘गणित चांगले आहे तुझे, यासाठी तुला टाळ्या मिळायला हव्यात. पण एक गोष्ट तू विसरलास. तिने 20 वर्षे अथक कष्ट करून तिचे करिअर घडवले आणि मुलाचे भविष्य सुरक्षित व्हावे, याचीही काळजी घेतली. या हिशोबाने 50 व्या वर्षीही तिला मुलाची चिंता करत बसावे लागणार नाही,’ असे रोहितने या ट्रोलरला सुनावले.
6 / 9
रोहितच्या या उत्तरानंतर अनेक चाहतेही अनिता व तिच्या पतीच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरले. त्यांनीही या ट्रोलरचा चांगलाच क्लास घेतला.
7 / 9
अनिता हसनंदानी सध्या 39 वर्षांची आहे. गेल्या 20 वर्षांपासून ती टीव्ही इंडस्ट्रीत काम करतेय.
8 / 9
अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
9 / 9
कभी सौतन कभी सहेली, ये हैं मोहब्बते, नागीन 3 या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. 2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली होती.
टॅग्स :अनिता हसनंदानी