५ वर्षाआधीच झाला होता रजनीकांतची दुसरी मुलगी Soundarya चा घटस्फोट, नंतर केलं दुसरं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 11:32 IST
1 / 9सुपरस्टार रजनीकांतच्या दोन्ही मुलींचं नशीब एकसारखंच आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर दोघींचाही पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला आहे. सोमवारी ऐश्वर्या रजनीकांतने अभिनेता धनुषसोबत आपला १८ वर्षांचा संसार मोडल्याची घोषणा केली. हे लग्न मोडल्याने फॅन्सना फारच वाईट वाटलं. ऐश्वर्याची बहीण सौंदर्याचा सुद्धा एकदा घटस्फोट झाला होता. 2 / 9सौंदर्या रजनीकांत ही थलाइवा रजनीकांत यांची छोटी मुलगी आहे. सौंदर्याने उद्योगपती अश्विन रामकुमारसोबत ३ सप्टेंबर २०१० मध्ये लग्न केलं होतं. या लग्नातून त्यांना एक मुलगाही झाला. वेदचा जन्म ६ मे २०१५ मध्ये झाला होता.3 / 9सप्टेंबर २०१६ मध्ये सौंदर्याने पतीपासून घटस्फोट घेतल्याची माहिती दिली होती. जुलै २०१७ मध्ये दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लग्न वाचवण्यासाठी दोन्ही परिवारांनी खूप प्रयत्न केले होते. पण सौंदर्याला घटस्फोट हवाच होता.4 / 9एका मुलाखतीत आपल्या लग्नावर बोलताना सौंदर्या म्हणाली होती की, माझे वडील आणि धनुषची लाइफस्टाईल एकसारखी आहे. त्यामुळे माझ्या बहिणीला जास्त त्रास झाला नाही. पण मला माझ्या लग्नात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. माझं आणि अश्विनची लाइफ फार वेगळं होतं.5 / 9अनेक वर्ष चाललेला संसार मोडल्यानंतर सौंदर्याच्या जीवनात पुन्हा एकदा प्रेम आलं. सौंदर्या अभिनेता आणि बिझनेसमन विशागन Vanangamudi सोबत प्रेमात पडली. दोघांनी ११ फेब्रुवारी २०१९ मध्ये लग्न केलं6 / 9सौंदर्याच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर ती व्यवसायाने ग्राफिक डिझायनर, निर्माती, दिग्दर्शक आहे. ती तमिळ सिने इंडस्ट्रीत काम करते. सौंदर्याने तिचे वडील रजनीकांत यांच्या Kochadaiyaan सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा तिचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता.7 / 9मीडिया रिपोर्टनुसार, विशागनचंही हे दुसरं लग्न आहे. त्याचंही पहिलं लग्न मोडलं होतं. विशागनची पहिली पत्नी एका मॅगझिनची एडिटर होती. विशागन एका फार्मा कंपनीचा मालक आहे. तर त्याचा भाऊ राजकारणात आहे.8 / 9सौंदर्या सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. ती तिच्या पतीसोबतचे फोटोही नेहमी शेअर करत असते. सौंदर्या तिच्या दुसऱ्या लग्नात चांगलीच आनंदी आहे.9 / 9