By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 17:57 IST
1 / 8रणबीर कपूर व आलिया भट गेल्या 6 नोव्हेंबरला आई-बाबा झालेत. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. चिमुकलीच्या जन्मानंतर कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.2 / 8आलिया व रणबीरने अद्याप मुलीचा एकही फोटो शेअर केलेला नाही. मुलीच्या नावाचाही खुलासा केलेला नाही. आता अशात या जोडप्यानं एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळतंय.3 / 8होय, विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवत आलिया व रणबीर यांनीही त्यांच्या लेकीचे फोटो क्लिक करण्यासाठी काही नियम ठरवले आहेत. इतकंच नाही तर नव्या चिमुकलीला भेटायला येणाºया पाहुण्यांनाही दोन अटींचं पालन करावं लागणार आहे.4 / 8आलिया व रणबीरने आपल्या बाळासाठी नो पिक्चर पॉलिसी अवलंबली आहे. दोघांच्या परवानगीशिवाय कुणीही त्यांच्या लेकीचा फोटो काढू शकत नाही, असा याचा अर्थ आहे.5 / 8 आलिया व रणबीरची लाडकी लेक आता घरी आली आहे. सगळेच तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु चाहत्यांना याबाबतीत मात्र निराश व्हावं लागणार आहे. कारण आलिया आणि रणबीरनं लेकीच्या सुरक्षेबाबत काही कठोर निर्णय घेतले आहेत. 6 / 8बॉलिवूड हंगामानं दिलेल्या, लेकीचे फोटो सोशल मीडियावर लीक होऊ नयेत, त्यांच्या कुटुंबाव्यतिरीक्त कुणीही पाहू नये यासाठी आलिया आणि रणबीरच्या जवळच्या मित्रमंडळींनादेखील बाळाचे फोटो काढण्याची परवानगी नाही. 7 / 8इतकंच नाही, त्यांच्या लेकीला ज्यांना भेटायचं आहे, अशा व्यक्तींची करोना टेस्ट निगेटिव्ह असायला हवी. तशी अटच घालण्यात आली आहे बाळ खूप लहान आहे. त्यामुळे तिला इन्फेक्शनचा धोका आहे. तो टाळण्यासाठी म्हणून आलिया व रणबीर खबरदारी घेत आहेत.8 / 8आपली मुलगी वर्षभराची होत नाही तोपर्यंत मीडिया व मित्रमंडळींनी या नियमांचं पालन करावं, असं आलिया व रणबीरने म्हटलं आहे. चाहत्यांकडूनही त्यांना हीच अपेक्षा आहे.