कतरिना-विकीनंतर ४५० वर्षे जुन्या किल्ल्यात ही अभिनेत्री बांधणारेय लग्नागाठ, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 12:04 IST
1 / 13कतरिना कैफ आणि विकी कौशलचा विवाह सोहळा ७०० वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडला. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री ४५० वर्षे जुन्या किल्ल्यात लग्नगाठ बांधणार आहे.2 / 13टेलिव्हिजन आणि साऊथ सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री आता लग्नबेडीत अडकणार आहे.3 / 13हंसिका मोटवानी या वर्षाच्या शेवटी लग्नबंधनात अडकणार आहे. 4 / 13ती डिसेंबरमध्ये जयपूरच्या ४५० वर्षे जुन्या किल्ल्यात सात फेरे घेणार आहे, ज्यासाठी हंसिका मोटवानीने तयारी सुरू केली आहे. या अभिनेत्रीने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.5 / 13मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या अभिनेत्री तिच्या लग्नाची जोरदार तयारी करत आहे. 6 / 13जयपूर येथील मुंडोटा किल्ल्यावर अत्यंत शाही पद्धतीने तिचे लग्न पार पडणार आहे. तिच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.7 / 13मात्र, हंसिका मोटवानी कोणासोबत लग्नाचे सात फेरे घेणार आहे, याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. 8 / 13 त्याचवेळी, अभिनेत्रीकडून लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.9 / 13हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून सिनेइंडस्ट्रीत सक्रिय होती. 10 / 13तिने छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध 'शाका लाका बूम बूम', 'क्यूँकी सास भी कभी बहू थी' आणि 'सोन परी' यासह इतर अनेक शो केले.11 / 13हंसिका मोटवानीने हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' या चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले आहे.12 / 13याशिवाय 'आपका सुरूर' आणि 'मनी है तो हनी है' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी हंसिका मोटवानी साउथ चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहे.13 / 13हंसिकाने दक्षिणेतील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे आणि तिच्या कामाची प्रशंसा देखील झाली आहे.