By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 14:40 IST
1 / 890 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री, रवीना टंडन एकेकाळी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होती. एंटरटेनमेंट रिपोर्ट्सनुसार, रवीनाच्या आयुष्यात एक वेळ आली जेव्हा ती पूर्णपणे खचली होती. ती डिप्रेशनमध्येही गेली होती, पण नंतर एक घटना घडली ज्याने अभिनेत्रीचं आयुष्य बदलून टाकलं.2 / 8अभिनेत्री रवीना टंडन आजही तिच्या अभिनयामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. पण ब्रेकअपमुळे तिला डिप्रेशनचाचा सामना करावा लागला. रवीनाने स्वत:च एका मुलाखतीदरम्यान याबद्दल सांगितलं होतं.3 / 8एका जुन्या मुलाखतीत त्या कठीण काळाबद्दल बोलताना रवीना टंडनने तिला आलेला अनुभव सांगितला आहे. 'त्या दिवसात मी खूप खचली होती आणि मला घरी राहावसं वाटत नव्हतं.'4 / 8'मग एक दिवस रात्री तीन वाजताच्या सुमारास मी मुंबईच्या रस्त्यावर फिरायला निघाले. तेवढ्यात माझी नजर झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेवर पडली. जिचा पती तिच्याशी भांडत होता आणि मारहाणही करत होता. ती बाई ढसाढसा रडत होती.'5 / 8'जेव्हा महिलेचा पती तिला मारहाण करत होता तेव्हा मध्येच तिचा मुलगा आला. मुलाला पाहताच महिला रडणं विसरली आणि त्याच्यासोबत खेळू लागली. तिच्यासोबत काहीतरी घडलंय हे ती विसरली. फक्त या गोष्टीने जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलला' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. 6 / 8रवीना या घटनेनंतर पूर्णपणे सावरली आहे. ब्रेकअपचं दुःख विसरून आयुष्याची नवी सुरुवात केली. अभिनेत्रीने बिझनेसमन अनिल थडानीसोबत लग्न केलं आहे आणि ती दोन मुलांची आई आहे.7 / 8रवीना टंडना अलीकडेच वन फ्रायडे नाईट वेब सीरिजमध्ये दिसली. रिपोर्टनुसार, अभिनेत्री सध्या संजय दत्तसोबत एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे. रवीना नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 8 / 8