Join us  

सलमान, गोविंदाच्या या अभिनेत्रीनं बॉलिवूडला ठोकला रामराम, आता ती करतेय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 5:38 PM

1 / 8
सलमान खानसोबत बंधन सिनेमात झळकलेली अभिनेत्री रंभाने आपल्या निरागस अदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यानंतर ती जुडवा चित्रपटात झळकली. या चित्रपटातील सलमान आणि तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली.
2 / 8
रंभाने तिच्या निरागस चेहरा, कुरळे केस आणि मोठ्या डोळ्यांनी सर्वांना आकर्षित केले होते, परंतु तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, रंभाने फिल्म इंडस्ट्री सोडली आणि आता या ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आपल्या कुटुंबासह आपले जीवन व्यतीत करत आहे.
3 / 8
रंभाने १९९५ मध्ये जल्लाद या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला पण जुडवा, बंधन आणि घरवाली-बाहरवाली यांसारख्या चित्रपटांमुळे तिला ओळख मिळाली.
4 / 8
रंभाने क्रोध, बेटी नंबर 1, क्योंकि... मैं झुठ नहीं बोलता यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
5 / 8
रंभाने केवळ हिंदीच नाही तर तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये १०० हून अधिक चित्रपट केले आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.
6 / 8
रंभाने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. एप्रिल २०१० मध्ये, तिने इंद्रकुमार पथमनाथन नावाच्या कॅनडास्थित व्यावसायिकाशी लग्न केले.
7 / 8
लग्नानंतर अभिनेत्रीने कलाविश्वाला अलविदा केला आणि टोरंटोमध्ये स्थायिक झाली. ती आता तीन मुलांची आई आहे, तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे.
8 / 8
रंभा २०११ मध्ये 'फिल्मस्टार' नावाच्या मल्याळम चित्रपटात शेवटची पडद्यावर दिसली होती. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते.
टॅग्स :सलमान खान