Join us

अभिनेत्री पल्लवी वैद्यचा पती आहे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, जाणून घ्या त्याच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 07:00 IST

1 / 10
सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं.(फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री पल्लवी वैद्यविषयी सांगणार आहोत.(फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अभिनय क्षेत्रात काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडीबाबत सांगणार आहोत. ही जोडी आहे प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि तिच्या पतीची. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
पल्लवी तिचा पतीही मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
पल्लवीच्या पतीचं नावं केदार वैद्य आहे. केदार एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. केदार वैद्य हे मराठी चित्रपट, मालिका दिग्दर्शक आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
माझ्या नव-याची बायको, माझे पती सौभाग्यवती, झिपऱ्या या मालिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ‘अगंबाई अरेच्चा!’ या चित्रपटात त्यांनी सह- दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची व पल्लवीची मैत्री झाली होती. ही मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि नंतर दोघांनी लग्न केले.(फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
पल्लवीने ‘अगंबाई अरेच्चा!’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. या चित्रपटातून ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती.(फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
पल्लवीने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत तिने पुतळा मातोश्रींची भूमिका साकारली होती. अनेक मराठी चित्रपटांतही ती झळकली आहे. गर्भ, झाले मोकळे आकाश या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी