लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 20:20 IST
1 / 8रणवीर सिंगसोबतच्या पहिल्याच चित्रपटातून सारा अर्जुनने बॉलिवूडमध्ये दिमाखदार एन्ट्री केली असून, तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.2 / 8साराने १३ जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यात तिने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला असून ती अत्यंत ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.3 / 8पदार्पणातच सारा 'सोशल मीडिया सेन्सेशन' बनली असून, तिचा हा नवीन लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या सौंदर्याची प्रतिमा चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे.4 / 8फोटोंना कॅप्शन देताना साराने दोन मेणबत्त्या आणि गुलाबाचे इमोजी वापरले आहेत. यावरून ती तिच्या पुढच्या मोठ्या प्रोजेक्टची तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत.5 / 8चित्रपटात सारा अर्जुनने मुख्य नायकाची प्रेयसी साकारली आहे. चित्रपटात ती बहुतेक वेळा एथनिक लूकमध्ये दिसली होती, मात्र तिचा हा मॉडर्न अवतार चाहत्यांना अधिक भावला आहे.6 / 8साराच्या या फोटोंवर 'धुरंधर'मधील तिचा सह-कलाकार दानिश पांडोर याने हार्ट इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे या मैत्रीची चर्चा रंगली आहे.7 / 8साराच्या या बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. काही युजर्सनी कमेंट्समध्ये तिला सुपरहॉट आणि सुंदर म्हटले आहे.8 / 8'धुरंधर' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने त्याचा फायदा साराच्या आगामी चित्रपटांना नक्कीच होईल, असा अंदाज चित्रपट तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.