कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 21:24 IST
1 / 9लोकप्रिय गायिका, समाजसेविका आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांना वेळप्रसंगी ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.2 / 9गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. त्यांचे कार्य कौतुकास्पद होते. पण त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून त्यांना खूप ट्रोल करण्यात आले.3 / 9केवळ हेच नव्हे तर अनेक कारणांवरून आणि गोष्टींवरून अमृता यांना ट्रोल करण्यात येते. या ट्रोलिंगबाबत नुकतेच इंडियाटुडेच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी अतिशय रोखठोक मत व्यक्त केले.4 / 9त्या म्हणाल्या, 'माझ्याबाबतीत असं अनेकदा घडलंय की लोक अचानक ओव्हरअँक्टिव्ह होतात. ते सहसा अशा मुद्द्यांवरून ट्रोलिंग सुरू करतात, ज्याने मूळ मुद्द्यापासून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न असतो.'5 / 9'गणपती विसर्जनानंतर जे झालं, त्यात आम्ही स्वच्छता करत होतो. लोक, एनजीओ आणि लहान मुलेही आमच्यासोबत स्वच्छता करत होते. आमचा हेतु हा होता पर्यावरणपूरक गणपती मूर्ति असाव्यात.'6 / 9'पण ट्रोलर्सने काय प्रमोट केलं? त्यांनी वेगवेगळ्या अँगलने झूम करून आणि फोकस करून माझ्या कपड्यांविषयी चर्चा सुरू केली की, हे पाहा किती वेगळ्या प्रकारचे कपडे घातले आहेत'7 / 9'यात काय घडलं? मूळ मुद्द्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकड वळवलं गेलं. ही ट्रोलिंग हँडल्स खूप वाईट आहेत. त्यांना याचे पैसे मिळतात आणि त्यानुसार ते लोक कामं करत असतात.'8 / 9'ज्या महिलेकडे स्वत:ची समज आहे, स्वत:चा आवाज आहे, त्या महिलेच्या मागे हे ट्रोलर्स लागले आहेत. हे केवळ माझ्याबाबतीत नाही तर प्रत्येत स्वतंत्र महिलेच्या बाबतीत घडतंय.'9 / 9'ट्रोलिंग हे बॅकग्राऊंड म्युझिक सारखं असतं. तो गोंगाट वाटू शकतो, त्याचा आनंद घेता येतो किंवा त्याकडे दुर्लक्षही करता येतं. तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवा,' असे त्या म्हणाल्या.