Join us

'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 17:21 IST

1 / 9
Actor Mohanlal: भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना भारतीय सिनेमाचा सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मोहनलाल यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत.
2 / 9
करिअरची सुरुवात आणि पहिला चित्रपट- मोहनलाल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये 'थिरानोट्टम' या चित्रपटातून केली. मात्र सेन्सॉरशी संबंधित अडचणींमुळे हा चित्रपट २७ वर्षांनी प्रदर्शित झाला. त्यानंतर त्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले.
3 / 9
विक्रमी वर्ष- मोहनलाल यांच्या कारकिर्दीतील १९८६ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. त्या वर्षी त्यांनी तब्बल ३४ चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यापैकी २५ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. विशेष म्हणजे, त्यावेळी त्यांचे वय फक्त २६ वर्षे होते.
4 / 9
राष्ट्रीय पुरस्कारांची कमाई- मोहनलाल यांना आतापर्यंत ५ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत: १९९०- 'किरीदम' साठी विशेष ज्यूरी पुरस्कार, १९९२- 'भारतं' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, २०००- 'वनप्रस्थानम' साठी फीचर फिल्म पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, २०१७- 'जनता गराज', 'मुन्थिरिवल्लिकल थलिर्ककुम्बोल' आणि 'पुलिमुरुगन' साठी विशेष ज्यूरी पुरस्कार
5 / 9
पद्मश्री आणि पद्मभूषण- भारत सरकारने चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी २००१ मध्ये पद्मश्री आणि २०१९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला आहे.
6 / 9
४०० हून अधिक चित्रपट- आजवर मोहनलाल यांनी आपल्या कारकिर्दीत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. त्यांच्या बहुगुणी अभिनयामुळे त्यांना फक्त मलयाळममध्येच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतही अद्वितीय स्थान मिळाले आहे.
7 / 9
अविस्मरणीय चित्रपट- मोहनलाल यांच्या कारकिर्दीतील काही चित्रपट कायम स्मरणात राहतील. त्यामध्ये मंजिल विरिंजा पुक्कल, किरीदम, भारतं, दृष्यम, पुलिमुरुगन, लुसिफर, जनता गैराज यांचा समावेश होतो. हे चित्रपट त्यांच्या अभिनयाची विविधता दाखवतात.
8 / 9
वैयक्तिक आयुष्य- मोहनलाल यांच्या लग्नाचा किस्सा विशेष आहे. त्यांनी आपली प्रेयसी सुचित्रा सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण कुंडली जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र, काही काळानंतर कुंडली तपासण्यात झालेली चूक लक्षात आली आणि १९८८ मध्ये दोघांचा विवाह पार पडला.
9 / 9
आगामी प्रकल्प- मोहनलाल सध्या अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये वृषभा आणि प्रेक्षकांच्या सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला दृष्यम ३ यांचा समावेश आहे.
टॅग्स :बॉलिवूडTollywoodफिल्मफेअर अवॉर्डदादासाहेब फाळके पुरस्कार