Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनोदाच्या नावावर छळ !

By admin | Updated: April 23, 2016 02:23 IST

विनोदातून लोकांचे मनोरंजन होते. संता-बंताचे विनोद नेहमीच ऐकले आणि ऐकवले जातात. मात्र दिग्दर्शक आकाशदीप यांनी संता-बंताचे विनोद खूपच गांभीर्याने घेत एक असा चित्रपट बनवला

विनोदातून लोकांचे मनोरंजन होते. संता-बंताचे विनोद नेहमीच ऐकले आणि ऐकवले जातात. मात्र दिग्दर्शक आकाशदीप यांनी संता-बंताचे विनोद खूपच गांभीर्याने घेत एक असा चित्रपट बनवला, ज्याचा मनोरंजनाशी काडीमात्र संबंध नाही! कमकुवत कथा, शेंडा आणि बुडूख नसलेली पटकथा आणि सुमार दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट पाहावत नाही. कथेच्या नावावर जे काही दाखवले गेले आहे, त्यानुसार संता (बोमन इराणी) आणि बंता (वीर दास) पंजाबचे मनमौजी भिडू आहेत. भारताचे फिजीतील उच्चायुक्त शंकर (अयूब खान) बेपत्ता होतात. भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे अधिकारी (विजय राज) हे प्रकरण हाताळण्यासाठी संता-बंताला फिजीला पाठवितात. ‘रॉ’च्या फिजीतील दोन सदस्यांची (लीजा हेडन आणि संजय मिश्रा) संता आणि बंताशी भेट होते. शंकरची पत्नी नेहा धुपिया व शंकर यांचे मित्र सोनू सुल्तान (राम कपूर) आणि नेपाळी डॉनही (जॉनी लिव्हर) आहे. संता-बंता शंकरच्या बेपत्ता होण्याचा भंडाफोड करून भारतात परततात. चित्रपटातील उणिवा - या चित्रपटात उणिवाच उणिवा आहेत. मनोरंजनाच्या नावावर विनोद आणि टोळ्यांचा असा काही वापर केला आहे की हसावे की रडावे, हेच समजत नाही. दिग्दर्शकाची कीव येते. चित्रपटातील सर्व पात्रे कमकुवत आहेत. कथा, पटकथा, कलावंतांचा अभिनय सर्वच आघाड्यांवर आनंदच आनंद आहे. बोमन इराणी, राम कपूर, वीर दास, विजय राज, संजय मिश्रा, लीजा हेडन आणि नेहा धुपिया यासारखे कलावंत या चित्रपटात काम करण्यासाठी कसे तयार झाले, याचेच आश्चर्य वाटते. या सर्वांचा अभिनय निराशाजनक आहे. जॉनी लिव्हर हसविण्याचा थोडा प्रयत्न करतो, मात्र त्यालाही यश येत नाही. आकाशदीप यांचे दिग्दर्शन कुठेही दिसत नाही.