Join us

कंगना राणौतसोबत काम करू नकोस असे मला अनेकांने बजावले होते; कनिका ढिल्लनचा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 18:19 IST

‘मेंटल है क्या’ या चित्रपटात कंगना राणौत आणि राजकुमार राव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. साहजिकचं चाहते हा चित्रपट पाहायला उत्सूक आहेत. पण त्याआधी ‘मेंटल है क्या’ची पटकथा लेखिका कनिका ढिल्लन हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

पटकथा लेखिका कनिका ढिल्लन ‘मनमर्जियां’च्या यशामुळे सुखावली असताना आता तिने आपल्या दुसऱ्या चित्रपटासाठी कंबर कसली आहे. हा चित्रपट आहे, ‘मेंटल है क्या’. या चित्रपटात कंगना राणौत आणि राजकुमार राव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. साहजिकचं चाहते हा चित्रपट पाहायला उत्सूक आहेत. पण त्याआधी ‘मेंटल है क्या’ची पटकथा लेखिका कनिका ढिल्लन हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. आता हा खुलासा कुणाबद्दल आहे, हे सांगायची गरज नाही. तुम्ही अंदाज बांधू शकताच. 

होय, कंगना राणौतबद्दल. कनिका ढिल्लनचे खरे मानाल तर, अनेकांनी तिला कंगनासोबत काम करण्याबद्दल सावध केले होते. अलीकडे कनिका यावर बोलली. कंगनाचे वादग्रस्त करिअर बघता, अनेकांनी मला तिच्यासोबत काम करू नकोस, असा सल्ला दिला होता. कंगनासोबत काम करणे तुझ्यासाठी एक वाईट अनुभव ठरेल, असे अनेकांनी मला सांगितले. पण माझा अनुभव याऊलट होता. लोक सांगतात तशी कंगना मुळीच नाही. तिच्यासोबत काम करून मला तिचा स्वभाव कळला. ती अतिशय निडर  , चाणाक्ष मुलगी आहे. केवळ इतकेच नाही तर इंटरेस्टिंग व्यक्ती आहे. तिच्यासोबत काम करताना मज्जा आली, असे कनिका म्हणाली.कंगना राणौत आणि वादांचे जुने नाते आहे. करिअरच्या सुरूवातीपासून ती यामुळेच अधिक चर्चेत राहिली. गतवर्षी कंगना आणि पटकथा लेखक अपूर्व असरानीच्या वादाचा एक अंक बराच गाजला होता. तूर्तास ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे कंगनाने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. अर्थात या वादांना जुमानणारी कंगना नाहीये.

टॅग्स :कंगना राणौतमेंटल है क्याराजकुमार राव