Join us

पीसीला हवाय ब्रेक

By admin | Updated: December 14, 2015 01:19 IST

प्रि यंका चोप्रा सध्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ करत असून संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ साठीही प्रमोशनला वेळ देत आहे.

प्रि यंका चोप्रा सध्या अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’ करत असून संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ साठीही प्रमोशनला वेळ देत आहे. ती चित्रपटात काशीबाईचे कॅरेक्टर करत असून सध्या ती कामाच्या संदर्भात फारच भावनाविवश झाली आहे. सततच्या कामामुळे ती कंटाळली आहे. आता तिला हवाय तो ब्रेक़ दिवाळीलाही ती अमेरिकेतच होती. आता न्यू ईअर तरी प्लॅन करावे असे तिला वाटत आहे. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत चार ते पाच दिवस एन्जॉय करावे असे तिला वाटतेय. ती म्हणते,‘ पेशवा बाजीरावाचे काही वंशज सेटवर येऊन गेले. त्यातील काही जण म्हणाले की, बाजीराव पेशवा रणवीर सिंगसारखा दिसतच नव्हता. पण मला वाटते की, इथे कोणीच कुणासारखे दिसत नसते. हा चित्रपट आत्तापर्यंत खुपच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण, चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वांना त्याचे महत्त्व कळेलच.’