Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीसीला ‘तमाशा’ पाहायचाय!

By admin | Updated: November 15, 2015 01:54 IST

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या चाहत्यांना जशी ‘तमाशा’ पाहण्याची ओढ लागली आहे तशीच ओढ प्रियंका चोप्रा हिलाही या चित्रपटाची लागली आहे.

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या चाहत्यांना जशी ‘तमाशा’ पाहण्याची ओढ लागली आहे तशीच ओढ प्रियंका चोप्रा हिलाही या चित्रपटाची लागली आहे. आॅनस्क्रीन फेव्हरेट कपल रणबीर-दीपिका यांची केमिस्ट्री अनुभवायची उत्सुकता स्टारकास्टनाही लागली आहे. संजय लीला भन्साली यांचा आगामी ऐतिहासिक रोमॅन्टिक चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’मध्ये प्रियंकाही काम करणार आहे. २७ नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होणार असून, दीपिकाची रणबीरसोबत कशी केमिस्ट्री आहे हे पाहण्यास सर्व जण उत्सुक आहेत. तिने टिष्ट्वट केले की, ‘कान्ट वेट अ‍ॅट दीपिका पदुकोण सेंट यू लिटिल समथिंग टू. सी यू संडे मस्तानी... लॉट्स आॅफ लव्ह अ‍ॅण्ड आय कान्ट वेट टू सी तमाशा.’