Join us
Daily Top 2Weekly Top 5

पायल घोषचा ‘यु टर्न’; ‘त्या’ वक्तव्यासाठी रिचा चड्ढाची माफी मागायला तयार

By रूपाली मुधोळकर | Updated: October 7, 2020 17:47 IST

रिचाने पायलविरोधात 1.1 कोटींचा मानहानी दावा दाखल केला होता.

ठळक मुद्देअनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले होते. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले होते.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोषने अचानक यु-टर्न घेत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. होय, रिचा चड्ढाबद्दल केलेले विधान मागे घेण्याची आणि त्यासाठी माफी मागण्याची तयारी तिने दर्शवली आहे. आज पायलचे वकील नितीन सातपुते यांनी स्वत: कोर्टासमोर ही माहिती दिली.रिचा चड्ढाने पायलवर 1.1 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता. आज या प्रकरणाची मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, तुमची अशील रिचा चड्ढाबद्दल केलेले विधान मागे घेण्यास तयार आहे का? अशी विचारणा कोर्टाने पायलच्या वकीलांना केली. यावर पायलच्या वकीलांनी होकारार्थी उत्तर दिले. माझी अशील विधान मागे घ्यायला आणि माफी मागायला तयार आहे, असे पायलच्या वकीलांनी यावेळी स्पष्ट केले.

 काय आहे प्रकरणपायल घोषनेअनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. अनुरागने 2014 मध्ये मला घरी बोलवून माझा विनयभंग केला आणि अश्लील वर्तन केले, असे पायलने आपल्या आरोपामध्ये म्हटले आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.  दरम्यान एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पायलने या घटनेबाबत बोलताना रिचा चड्ढाच्या नावाचा उल्लेख केला होता. रिचा चड्ढा, हुमा कुरेशी आणि माही गिलसारख्या अभिनेत्री त्याला ‘सेक्शुअल फेवर’ देतात, असे अनुराग आपल्याला म्हणाल्याचे पायलने या मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर रिचने पायलविरोधात हायकोर्टात धाव घेतली आणि पायलविरोघात मानहानीचा दावा ठोकला होता.

काय म्हणाली होती पायल घोषअभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे.झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने तिच्यासोबत काय काय केले, ते सविस्तर सांगितले होते. तिने सांगितले की, ‘अनुरागने मला घरी बोलावले होते. तो स्मोकिंग करत होता. काही वेळानंतर त्याने मला दुस-या खोलीत नेले.  त्यानंतर त्याने मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्याला  मला कन्फर्टेबल वाटत नाही, असे म्हणाले. यावर मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाला.  मी  तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावलं. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो.

 ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप भारतात नव्हताच...! पायल घोषच्या आरोपांनंतर दिग्दर्शकाच्या वकीलाचा दावा

तर अनुरागला थेट कोर्टात खेचले असते...! रिचा चड्डाने ट्रोलरला दिले सणसणीत उत्तर

अनुरागने नाकारले होते आरोपअनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले होते. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले होते.हा सगळा मला फसवण्याचा कट असल्याचा दावा अनुरागने केला होता.क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत, असे   ट्विट अनुरागने त्याने केले होते.

टॅग्स :पायल घोषअनुराग कश्यपरिचा चड्डा