TV Actor : टीव्ही मालिकांमधील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या ऋत्विक धनजानी या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.ऋत्विक धनजानी एक उत्तम अभिनेता आहेच त्याशिवाय तो एक उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणूनही प्रसिद्ध आहे. ऋत्विकला ' पवित्र रिश्ता ' या टीव्ही मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली. त्याने आपल्या करिअरमध्ये मोठा संघर्ष केला आहे. मात्र, करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यांत त्याला देखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.
कास्टिंग काऊच या प्रकाराला अनेक अभिनेते,या अभिनेत्री सामोरे गेले आहेत. चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने अभिनेते, अभिनेत्रींना निर्माते, दिग्दर्शक फायदा घेत असतात.ऋत्विक धनजानीने टू गर्ल्स अॅंड टू कॅप्स या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. तिथे त्याने खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलं. तो असं म्हणाला की, मुंबईतील आराम नगर मध्ये त्याची भेट एका कास्टिंग दिग्दर्शकासोबत झाली. तेव्हा तो फक्त २० वर्षांचा होता. त्यावेळी अभिनेत्याला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. त्यावेळी अभिनेता म्हणाला,"तो माणूस मला स्टुडिओच्या आत घेऊन गेला आणि म्हणाला,'तू शॉर्टलिस्ट झाला आहेस.त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटले, जणू काही देवदूत बनून तो माझ्यासाठी धावून आला असं मला वाटत होतं. मी खूप आनंदात होतो आणि त्यानंतर मी त्यांचे आभार मानले.मग तो म्हणाला की,तुला लगेचच माझ्या ऑफिसमध्ये यावं लागेल आणि मी त्यांना होकार दिला."
त्यानंतर ऋत्विकने सांगितलं की, जेव्हा तो त्याच्या बाईकवरून तिथे पोहोचला तेव्हा तो व्यक्ती देखील त्याच्या बाईकवर बसला आणि ऋत्विकला सोबत घेऊन गेला. त्या घटनेबद्दल सांगताना मग तो म्हणाला,खरंतर मला तेव्हाच समजायला हवं होतं की काहीतरी गडबड आहे कारण इतक्या मोठ्या माणसाकडे एक गाडी नाही हे खरंच आश्चर्य वाटण्यासारखं आहे. पुढे रस्त्यात तो कास्टिंग दिग्दर्शक त्याने कोणाची कास्टिंग केली आहे. याबद्दल सांगू लागला. मात्र, ऑफिसच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोठी गजबड झाली.
दिग्दर्शकाने केलं गैरवर्तन...
मग ऋत्विक म्हणाला,"तिथे पोहोचल्यानंतर मी पाहिलं तर ते कोणतं ऑफिस नव्हतं तर एक किराणाचं दुकान वाटत होतं. शिवाय एक बन मस्का स्टॉल तिथे होता. ते सगळं पाहिल्यानंतर मी विचारातच पडलो.खरंच तो कास्टिंग दिग्दर्शक आहे का असा मलाच प्रश्न पडला होता. त्यानंतर त्याने मला अशा एका ठिकाणी घेऊन गेले जिथे सगळीकडेच अंधार होता आणि वर एका खोलीत जाण्यासाठी सीढी होती. तिथे गेल्यानंतर तो म्हणाला, वर ये. सुरुवातीला तिथे जायला मी घाबरलो, माझी पॅन्ट ओली झाली. तेवढ्यात मला जाणवलं कीस नक्कीच काहीतरी गजबड आहे."
२० वर्षांचा असताना घडलेला प्रकार..
त्या ठिकाणी गेल्यानंतर तो मला म्हणू लागला, "इंडस्ट्रीत तुला यशस्वी होण्यासाठी स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे.मग त्याने मला स्पर्श करायला सुरुवात केली. त्याने मला स्पर्श करताच मी घाबरलो. तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. मी थरथर कापत होतो.पण, कसा तरी मी तिथून बाहेर पडलो. हा सगळा प्रकार माझ्या मित्राला मी सांगितला, इंडस्ट्रीत असं होतंच असतं असं तो म्हणाला. पण मला त्यातून सावरायला बराच वेळ लागला."
Web Summary : Rithvik Dhanjani recounts a harrowing casting couch experience at 20. A director lured him under false pretenses, leading to a disturbing encounter. He escaped, shaken.
Web Summary : ऋत्विक धनजानी ने 20 साल की उम्र में कास्टिंग काउच के एक भयावह अनुभव को याद किया। एक निर्देशक ने झूठे बहाने से उसे लुभाया, जिससे एक परेशान करने वाली मुठभेड़ हुई। वह डर के मारे भाग गया।