Join us
Daily Top 2Weekly Top 5

पतौडी कुटुंबाचा स्वॅग! युरोप ट्रीपवरुन परतले सैफ-करीना; तैमूर-जेहच्या क्युट वॉकने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 17:38 IST

सैफ- करीना मुंबईत आले, विमातळावर पतौडी कुटुंबाचा स्वॅग पाहिलात का?

उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अनेक बॉलिवूड मंडळी परदेशात जातात. तिथल्या हलक्या उन्हाचा आनंद घेतात. नुकतंच पतौडी खानदान म्हणजेच सैफ-करीना (Kareena Kapoor Khan) मुलांसह पुन्हा मुंबईत परत आले आहेत. विमानतळावर त्यांचा स्वॅग पाहून सर्वच खान कुटुंबावर फिदा झालेत. तैमूर आणि जेहचा क्युट वॉक पाहून चाहते खूश झालेत.

सैफ अली खान (Saif Ali Khan)  कुटुंबासोबत गेल्या महिनाभरापासून सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. याच कारणाने त्यांनी अंबानींच्या वेडिंगलाही हजेरी लावली नाही. करिष्मा कपूर सुद्धा काही दिवस तिथेच होती. करीना-करिष्मा या बहिणींचे फोटोही व्हायरल झाले होते. आता नुकतंच खान कुटुंब मुंबईत परत आलं आहे. त्यांचा विमानतळावर वेगळाच स्वॅग दिसून आला. करीनाच्या चेहऱ्यावर कमालीचा ग्लो दिसला तर सैफही नेहमीप्रमाणेच डॅशिंग स्टाईलमध्ये होता. त्यांची दोन्ही मुलं तैमुर आणि जेह यांच्या क्युट वॉकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

कालच करीनाने व्हॅकेशन संपल्याचा बीचवरील फोटो शेअर केला होता. see you soon Mumbai असं कॅप्शनही तिने लिहिलं होतं. युरोपमधील अनेक शहरात त्यांनी मनसोक्त फिरण्याचा आनंद घेतला. ग्रीसमधील त्यांचे बीच फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

वर्कफ्रंट

करीना कपूर खान आगामी 'सिंघम अगेन' मध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या या सिनेमात तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर सैफ अली खान ज्युनिअर एनटीआरच्या 'देवारा पार्ट 1' मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो खलनायक आहे.

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरतैमुरबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया