अभय देआोल - प्रीती देसाई : अभय आणि प्रीती हे हॉट कपल २०११ पासून एकत्र होतं काही काळ ते लिव्ह-इनमध्येही होते. पण २०१५ साली त्यांचे ब्रेकअप झाले.
कल्की कोचलिन - अनुराग कश्यप : बॉलिवूडमधील एक गुणवान अभिनेत्री अशी ओळख असलेली कल्की कोचलीन आणि एक नामवंत दिग्दर्शक असलेला अनुराग यांची प्रेमकहाणी देव-डीच्या सेटवर सुरू झाली. २०११ साली त्यांनी लग्न केले मात्र काही महिन्यांनी त्यांच्यात खटके उडाल्याचे वृत्त आले. अखेर नोव्हेंबर २०१३ मध्ये त्यांनी जॉईंट स्टेटमेंट काढून आपण वेगळं होत असल्याची घोषणा केली आणि २०१४ साली घटस्फोटासाठी अर्ज केला.
हृतिक - सुझान : बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ख्याती असलेला अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान हे लव्हबर्डस २० डिसेंबर २००० साली लग्नबंधनात अडकले. मात्र १३ वर्षांच्या संसारानंतर त्यांचे एकमेकांशी पटेनासे झाले आणि १ नोव्हेंबर २०१४ मध्ये ते विभक्त झाले.
कतरिना - रणबीर : बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे कतरिना कैफ आणि रणबीर कपूर गेल्या ६ वर्षांपासून एकत्र होते. अजब प्रेम की गजब कहानी चित्रटपटादरम्यान एकत्र काम करताना त्यांच्यात प्रेम फुलले. कतरिनासाठी रणबीरने त्याची माजी गर्लफ्रेंड दीपिकाला सोडून दिले आणि हे दोघे एकत्र लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहू लागले. पण मध्यंतरी त्यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दोघांचे ब्रेक-अप झाल्याचे वृत्त आले.
फरहान आणि अधुना - दिल चाहता है चित्रपटाच्या दरम्यान फरहानची त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी मोठ्या असलेल्या अधुनाशी ओळख झाली आणि २००० साली ते विवाहबंधनात अडकले. मात्र लग्नाच्या १५ वर्षानंतर त्या दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एका सहअभिनेत्रीशी फरहानची जवळीक वाढल्यामुळेच त्यांच्या नात्यात तडा गेल्याची चर्चा आहे. या दोघांनाही शक्या आणि अकिरा या दोन मुली आहेत.
अभिनेता- दिग्दर्शक फरहान अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांच्या घटस्फोटाचे वृत्त सर्वांसाठीच धक्कादायक होते. मात्र या बातमीनंतर एक विचित्र योगायोग समोर आला तो म्हणजे फरहानची बहीण झोया अख्तरने दिग्दर्शत केलेल्या जिंदगी मिलेगी ना दोबारा या प्रसिद्ध चित्रपटात झळकलेले सर्वच अभिनेते आपापल्या पार्टनरपासून वेगळे झाले आहेत. हृतिक रोशन फरहान अख्तर कल्की कोचलिन कतरिना कैफ आणि फरहान हे पाचही कलाकार खासगी आयुष्यात आपल्या जो़डीदारापासून विभक्त झाले आहेत.