वरुण धवन ‘ढिशूम’च्या रीलीजनंतर चांगलाच चर्चेत आला आहे. ढिशूमनंतर त्याने लगेचच ‘जुडवा’चा सीक्वेल साइन केला. मात्र, दिग्दर्शकांसमोर एकच प्रश्न होता तो म्हणजे वरुणची हीरोइन यात कोण असेल? दिग्दर्शकाने नायिकेचा खुलासा केला आहे. ‘जुडवा २’मध्ये हीरोइन म्हणून परिणीती आणि जॅकलिन दिसणार आहेत. दिग्दर्शक म्हणाले, ‘आम्हाला वरुणसोबत बॉलीवूडच्या टॉप अॅक्ट्रेसपैकी दोनची निवड करावयाची आहे. परिणीती-वरुण ‘ढिशूम’मधील एका गाण्यासाठी एकत्र आले होते. ढिशूममध्ये जॅकलिन ही वरुणची नायिका नसून जॉनचा ‘लव्ह इंटरेस्ट’ दाखवण्यात आली आहे. ‘जानेमन आह’ या गाण्यात हिट ठरलेली जोडी वरुण-परिणीती यांना पुन्हा एकदा आता ‘जुडवा २’ मध्ये पाहता येऊ शकते. सध्या परिकडे तारखा फार कमी असून तिचे आगामी बरेच प्रोजेक्ट्स लवकरच येतील.
‘जुडवा २’मध्ये परिणीती-वरुण?
By admin | Updated: September 1, 2016 02:29 IST