Join us
Daily Top 2Weekly Top 5

'परिणीती भाभी जिंदाबाद'...; प्रेक्षकांनी घोषणा देत मैदान गाजवलं, अभिनेत्रीने अशी दिली रिॲक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 09:23 IST

आम आदमी पार्टीचे (आप) खासदार राघव चड्ढा यांच्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा खूप चर्चेत आहे.

वादळी फलंदाजीला स्फोटक फटकेबाजीने प्रत्युत्तर देत मुंबई इंडियन्सने तब्बल ४३० धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा ६ गड्यांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पंजाबने २० षटकांत ३ बाद २१४ धावा उभारल्या. हे आव्हान १८.५ षटकांमध्येच पार करताना मुंबईने ४ बाद २१६ धावा केल्या. यासह मुंबईने घरच्या मैदानावर पंजाबकडून मिळालेल्या पराभवाचा वचपाही काढला. 

मुंबईच्या पंजाबविरुद्धच्या विजयाची चर्चा सुरु असताना हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थिती लावणाऱ्या दोन विशेष लोकांची चर्चा देखील रंगली आहे. आम आदमी पार्टीचे (आप) खासदार राघव चड्ढा यांच्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा खूप चर्चेत आहे. दरम्यान, परिणीती चोप्राचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये परिणीतीने राघव चड्ढा यांच्यासोबत मोहालीमध्ये मुंबईविरुद्ध पंजाबच्या सामन्याचा आनंद लुटल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे नाव सतत चर्चेत आहे. ते अनेकदा मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये देखील दिसले. दरम्यान, ताज्या फोटोमुळे परिणीती आणि राघव पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा लेटेस्ट फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचा नेता राघव मोहाली क्रिकेट स्टेडियममध्ये दिसत आहेत. परणीतीने देखील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

परिणीती आणि राघवला चड्ढा यांना पुन्हा एकत्र पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या डेटींगची चर्चा रंगली आहे. दोघांना एकत्र पाहून मोहाली स्टेडियममध्ये 'परिणीती भाभी जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. चाहत्यांच्या या घोषणा ऐकल्यानंतर परिणीतीने डोक्याला हात मारत रिॲक्शन दिली.

राघव आणि परिणीती लग्न करणार?

लग्नाच्या बातम्यांमुळे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचीही नावे चर्चेत आहेत. परिणीती आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्याशी लग्न करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र, अद्याप या दोघांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर अनेकदा परिणीती चोप्रा लग्नाच्या प्रश्नावर उडवाउडवीची उत्तरे देताना दिसली आहे. मात्र आता पुन्हा-पुन्हा एकत्र स्पॉट झाल्यामुळे त्यांच्या डेटींगच्या बातम्यांनाही जोरदार वारे मिळत आहे.

टॅग्स :परिणीती चोप्राआयपीएल २०२३बॉलिवूडआप