Join us  

एवढा कसला माज? पलक तिवारीने इशान खट्टरला केलं इग्नोर, Video पाहून नेटकऱ्यांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 4:11 PM

काल मुंबईत एक अवॉर्ड सोहळा पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी ग्रँड एंट्री घेतली.

टेलिव्हिजन क्वीन श्वेता तिवारी (Shweta Tiwari) जितकी चर्चेत असते तितकीच आता तिची मुलगी पलक तिवारीही (Palak Tiwari) व्हायरल होत आहे. पलक कुठेही दिसली की पापाराझी तिला फॉलो करतात. आजकाल तिचं अफेअर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत सुरु आहे. नुकतंच पलक एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी रेड कार्पेटवर तिने ईशान खट्टरला दाखवलेला अॅटिट्युड तिला महागात पडला आहे. पलक सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.

काल मुंबईत एक अवॉर्ड सोहळा पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी ग्रँड एंट्री घेतली. सर्वच कलाकार ग्लॅमरस अंदाजात आले होते. तमन्ना भाटिया, विजय वर्मा, आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह, अवनीत कौर, फातिमा सना शेखसह अनेक कलाकार दिसले. यावेळी इशान खट्ट्रर रेड कार्पेटवर माध्यमांना पोज देत होता. तर पलक तिवारी बाजूला खाली मान घालून उभी होती. इशानचं झाल्यावर ती रेड कार्पेटवर येणार होती. यावेळी इशान खट्टर गप्पा मारत पुढे येत होता. तेव्हा पलक तो बाजूला होण्याची वाट पाहत होती. इशानने तिच्याकडे पाहिलं पण पलक मात्र खाली मान घालून चेहऱ्यावर थोडंही हसू न ठेवता उभी होती. 

पलकचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केली. 'एवढा कसला अॅटिट्यूड','कशात काही नाही आणि अॅटिट्यूड बघा','काहीतरी गडबड दिसत आहे. तिला इशान अजिबातच आवडत नाही असं दिसतंय' अशा कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत. 

टॅग्स :पलक तिवारीइशान खट्टर