Join us

पाकिस्तानी कलाकारांची छाप

By admin | Updated: September 21, 2015 03:00 IST

मनोरंजन उद्योगात भारतीय क्रीडा संघात अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले पुरुष आहेत, ज्यांना जगभर चाहते आहेत. तथापि, सीमापारही अनेक सुंदर आणि आकर्षक चेहरे आहेत.

मनोरंजन उद्योगात भारतीय क्रीडा संघात अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले पुरुष आहेत, ज्यांना जगभर चाहते आहेत. तथापि, सीमापारही अनेक सुंदर आणि आकर्षक चेहरे आहेत. शेजाऱ्यांशी संबंध चांगले नसल्याने आपले लक्ष त्यांच्याकडे फारसे जात नाही. हे आकर्षक व्यक्तिमत्त्व भारतीय महिलांवरही आपली छाप सोडतात. सुंदर चेहरा आणि प्रतिभा यांच्याबाबतीत विचार करायचा असेल तर प्रत्येक पाकिस्तानी पुरुषामध्ये तुम्हाला वंशागत वेगळेपण पाहावयास मिळेल. अशा मोहक व्यक्तिमत्त्वाचे धनी केवळ कलाकारच असत नाहीत, तर त्यामध्ये तर मॉडेल्स, क्रिकेटपटू, संगीतकार यांचाही समावेश होतो. पाकिस्तानमधील अशा विख्यात व्यक्तिमत्त्वाने अनेक भारतीय आणि इतरांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय. पाकिस्तानी कलाकारांना जगभरात आपली कला दाखविण्यासाठी दारे खुली केली जात आहेत. आकर्षक व्यक्तिमत्त्व, जबरदस्त आवाज आणि अभिनय यामुळे लाखोंची हृदये काबीज करण्याचे काम त्यांनी केले आहे. प्रतिष्ठित आणि प्रशंसनीय भाषेमुळे त्यांचे देशात हजारो महिला फॅन्स आहेत. अशाच काही पाकिस्तानी कलाकारांचा परिचय येथे देत आहोत.उस्मान बट्ट : केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर पत्रकार, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याच्या या प्रतिभेमुळे त्याला पाकिस्तानचा ओरलँडो ब्लूम म्हणून त्याचे चाहते ओळखतात. औन झारा चित्रपटातील ‘औन’ची साकारलेली भूमिका अनेकांच्या कौतुकास पात्र ठरलीय.शहरयार मुनव्वर सिद्दिकी ‘जिंदगी गुलजार हैं’मधील भूमिकेमुळे सिद्दिकीने अनेकांची मने जिंकली आहेत. सहजसुलभ हास्य आणि प्रेमळ डोळे यामुळे त्याने अनेकांच्या हृदयावर राज्य केले आहे.अहमद शहजाद : या पाकिस्तानी क्रिकेटपटूने आपल्या चाहत्यांच्या बाबतीतले शतक झळकावले नाही, तर क्रिकेटमधील प्रत्येक प्रकारच्या सामन्यात शतक झळकावले आहे.अम्मार बिलाल : रॅम्पवर चालताना बिलाल हा आकर्षक वाटतोच, त्याचप्रमाणे त्याची विविध रूपेही भारावून टाकतात. फॅशन डिझायनर असणारा बिलाल ही रॅम्पवरील जणू जादूच. पाकिस्तानी फॅशन इंडस्ट्रीमधील सर्वात प्रतिभावंत कलाकार म्हणून त्याची ओळख आहे. अतिफ अस्लम : आपल्या आवाजाने प्रत्येकाला त्याने वेड लावलंय. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि रुबाबदार उपस्थितीने मुलामुलींमध्ये तो नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यामुळे अनेकांनी प्रेरणा घेतलीय. अब्बास जाफरी : तीक्ष्ण चेहऱ्याचा, नाजूकशा डोळ्याचा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे तो सर्वांच्या नजरेत भरतो. क्रिकेटरपासून मॉडेलपर्यंत त्याने सर्व काही बदलले आहे.आदिल हुसेन कुशाग्र बुद्धीचा आदिल हा केवळ अभिनेता नाही, तर फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर आणि चित्रपटनिर्माता म्हणूनही त्याची ओळख आहे. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून त्याने आपले टॅलेंट दाखविले आहे. त्यामुळे तो अनेकांचा चाहता बनला आहे. ‘मोहब्बत सुबह का सितारा हैं’ या मालिकेतील त्याची भूमिका सर्वांनाच पसंत पडलीय. अली जाफर सर्वजण त्याला हँडसम म्हणूनच ओळखतात. त्याशिवाय तो गायक आणि अभिनेताही आहे; मात्र तो अत्यंत कलात्मक चित्रकार असल्याचे बऱ्याच जणांना माहिती नाही. इम्रान अब्बास पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीमधील हा एक महत्त्वाचा भाग. लॉलीवूड आणि नुकताच बॉलीवूडचाही आता भाग बनलाय. इम्रानने आर्किटेक्चरमधील पदवी मिळवलीय. मॉडेलपासून अभिनेता बनलेल्या इम्रानला पाहणे खरंच वेगळेपण आहे.फवाद खान याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तो प्रत्येक पाकिस्तानी महिलांचा आवडता कलाकार असून, ‘जिंदगी गुलजार हैं’च्या माध्यमातून तो भारतातही लोकप्रिय बनलाय. ‘हमसफर’ आणि ‘खूबसूरत’मधील त्याची भूमिका सर्वकाही सांगून जाते.