झी मराठी वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’ (Pahile Na Mi Tula ) या मालिकेतील अभिनेत्री तन्वी मुंडळे (Tanvi Prakash Mundle) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तन्वीचे वडील प्रकाश मुंडळे यांचे नुकतेच निधन झाले. तन्वीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.पोस्टमध्ये तन्वी तिच्या वडिलांसोबत दिसतेय. या पोस्टमध्ये आपल्या बाबाला उद्देशून ती लिहिते, ‘तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे. खूप प्रेम आबु... माझी वेळ येईल तेव्हा आपण नक्की भेटू....’या पोस्टवरून बापलेकीचं नातं किती मैत्रीपूर्ण होतं, याचा अंदाज येतो. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिचं सांत्वन करत, तिच्या बाबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महेश कोठारे यांनी तन्वीला ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत नायिकेच्या भूमिकेसाठी निवडले. मात्र प्रेक्षकांच्या अल्पशा प्रतिसादामुळे आणि कथानक दमदार नसल्याने ही मालिका आटोपती घेण्यात आली.