Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहेन दी पुरा लंडन का ठुमका

By admin | Updated: April 14, 2016 04:04 IST

कोणते लग्नसोहळे, कार्यक्रम असो नजर जाते ती प्रत्येकाच्या कपड्यांवर. वा... वा अरे किती छान कपडे आहेत किंवा कुठून घेतले, कितीला, अशा अनेक प्रश्नांना या वेळी सामोरे जावे लागते.

कोणते लग्नसोहळे, कार्यक्रम असो नजर जाते ती प्रत्येकाच्या कपड्यांवर. वा... वा अरे किती छान कपडे आहेत किंवा कुठून घेतले, कितीला, अशा अनेक प्रश्नांना या वेळी सामोरे जावे लागते. अभिनेत्री स्पृहा जोशीलादेखील अशाच प्रश्नांना सामारे जावे लागले, पण त्यामुळे साहजिकच तिला या प्रश्नांनी आठवण करून दिली ती लंडनच्या शॉपिंगची. स्पृहाने मध्यंतरी सुंदर असा व्हाइट कलरचा वन पीस परिधान केला होता. त्यावर गोल्डन कलरची आकर्षित अशी वेस्टर्न पद्धतीची माळ गळ््यात घातली होती. यामध्ये तिचा हा अंदाज एकदम हटके दिसत होता. त्यामुळे तिच्या कॉश्चुमचे सर्वांनी भरभरून कौतुक केले. या जबरदस्त काश्च्युमवर स्पृहाने मस्त फोटोसेशनदेखील केले आहे. तिचे हे रूप पाहता असेच म्हणावे लागेल की, नचदे पहेन दी पुरा लंडन का ठुमका.