Join us

"आपला देश वीरांचा आणि हुतात्म्यांचा आहे", पहलगाम हल्ल्याची आठवण काढत कैलाश खेर बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 11:09 IST

Kailash Kher: आज देशात सगळीकडे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो आहे. एका कार्यक्रमात नुकतेच कैलाश खेर यांनी आपल्या सुरेल स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याची आठवण काढत त्यावर प्रतिक्रिया दिली.

आज देशात सगळीकडे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो आहे. एका कार्यक्रमात नुकतेच कैलाश खेर (Kailash Kher) यांनी आपल्या सुरेल स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याची आठवण काढत त्यावर प्रतिक्रिया दिली. गायक म्हणाले, ''आपला देश निर्माण झाल्यापासून त्याने बलिदान दिले आहेत.''

एबीपीच्या 'इंडिया अनशेकेन: सैल्यूट टू सिंदूर' कार्यक्रमात कैलाश खेर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते म्हणाले की, ''भारताने अनेक वेळा आपले लोक गमावले आहेत, ही भूमी शहीदांची आहे. ही भूमी शूरांची आहे. पण आता काहीतरी बोलण्याची वेळ आली आहे. पहलगाम हल्ल्यात ज्या लोकांनी आपले प्राण गमावले ते जाताना संदेश देऊन गेले होते की, ''जे गेले ते सोडून द्या आणि जे उरले आहे ते धरून ठेवा.'' आता आपल्या भारताची वेळ आली आहे आणि तुम्ही त्याचे परिणाम आधीच पाहत आहात.''

''शहीद झालेल्यांनी अनेकांना दिली प्रेरणा''कैलाश खेर म्हणाले, ''शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करू इच्छितो कारण त्यांच्या बलिदानामुळे आज आपल्या देशाचा प्रत्येक कण वाचला आहे. देश पूर्वीही अस्तित्वात होता, पण आज जे आहे ते वेगळे आहे. मला माहित नाही की किती लोक कोणत्याही उद्देशाशिवाय जातात. पण देशाच्या फायद्यासाठी जाणारे काही प्रेरणा मागे सोडून जातात, कारण ते युगानुयुगे लक्षात ठेवले जाते. आता माझ्या भारताचा काळ आहे. हा कार्यक्रम शहीदांचे मनोबल वाढवत आहे. ऑपरेशन सिंदूरचा परिणाम जगभर दिसून येतो. शहीदांच्या कुटुंबियांच्या हृदयातून आशीर्वाद आणि प्रार्थना बाहेर पडत आहेत.''

''हल्ल्याच्या एका फोटोने सर्वांनाच निशब्द केले''ते पुढे म्हणाले की, ''या हल्ल्याचे एक फोटो होता ज्याने सर्वांना निशब्द केले होते. ते फोटो हिमांशीचे होते. मग असे वाटले की हा कोण आहे जो देशाचा शत्रू आहे. हिमांशीच्या एका फोटोने सर्वांना वेडेपीसे केले होते. त्यामुळे सर्वांच्या मनात द्वेषाची आग पेटली आणि मग निकाल तुमच्या समोर आहे.''

टॅग्स :कैलाश खेरपहलगाम दहशतवादी हल्लास्वातंत्र्य दिन