Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बाजीराव-मस्तानी’तील 'पिंगा' आणि ‘मल्हारी’ गाण्यावर आक्षेप

By admin | Updated: December 4, 2015 19:49 IST

'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' अणि बाजीराव यांच्यावर चित्रित झालेले ‘मल्हारी’ हे गाणे चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी उदयसिंह पेशवे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ४ - 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' अणि बाजीराव यांच्यावर चित्रित झालेले ‘मल्हारी’ हे गाणे चित्रपटातून काढून टाकावे. त्याचसोबत चित्रपट प्रदर्शित करण्याआधी तो आम्हाला दखावण्यात यावा अशी मागणी उदयसिंह पेशवे यांनी केली आहे.

पेशवा घराण्यातील कुठल्याही महिलेनं नाच केला नाही. चित्रपटात बाजीरावांना सुद्धा नाचताना दाखवलं आहे. त्यामुळे चित्रपटातील पिंगा आणि मल्हारी ही दोन गाणी काढून टाकावीत, अशी मागणी उदयसिंह पेशवा यांनी केली आहे. यासंदर्भात आज मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. गेल्या साढ़े तीनशे वर्षाच्या इतिहासाच्या संदर्भाची या चित्रपटात पायमल्ली केली असून यातील पिंगा आणि मल्हारी ही गाणी काढून टाकावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे. 
या पत्रकार परिषदेत मस्तानी यांचे वंशज अवैस बहादुर  नवाब अणि तत्कालीन पेशव्यांच्या सेनापती एकमेव महिला योद्धा उमाबाई दाभाडे यांचे वंशज सरदार सत्यशीलराजे दाभाडे ही उपस्तिथ होते. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही मात्र आपत्तिजनक गाणी अणि दृश्य वगळुन चित्रपट प्रदर्शित करावा असे दाभाडे राजे यांनी म्हटले.
 
मस्तानी साहेबा ह्या नृत्य करत होत्या, पण असे नाही जसे फ़िल्म मध्ये दाखवले आहे, मस्तानी जी कृष्ण भक्त होत्या असे मस्तानी यांचे वंशज अवैस बहादुर नवाब साहेब यांनी यावेळी सांगितले.  मध्य प्रदेशतल्या इंदूर उच्च न्यायालयात आम्ही याबाबत याचिका केली असल्याची माहिती ही शाहीन यांनी यावेळी दिली. एकंदर पेशवे आणि मस्तानी यांच्या वंशजांच्या नाराजीमुळे बाजीराव-मस्तानी हा चित्रपट प्रदर्शित होण्यात अडचणी येणार असल्याची चिन्हे आहेत.