Join us

क्रितीची एकच इच्छा!

By admin | Updated: April 19, 2017 00:38 IST

बॉलिवूडला सध्या यंदाच्या आयफा अ‍ॅवॉर्डचे वेध लागले आहेत. येत्या जुलै महिन्यात न्यूयॉर्कमध्ये हा सोहळा रंगणार आहे. सध्या या पुरस्कारासाठी वोटिंग सुरू आहे

बॉलिवूडला सध्या यंदाच्या आयफा अ‍ॅवॉर्डचे वेध लागले आहेत. येत्या जुलै महिन्यात न्यूयॉर्कमध्ये हा सोहळा रंगणार आहे. सध्या या पुरस्कारासाठी वोटिंग सुरू आहे. अभिनेत्री क्रिती सेनॅन हिनेही आपला आवडता अभिनेता, आवडती अभिनेत्री आणि आवडता चित्रपट अशा तीन विभागांत मत दिले. आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट आयफा अ‍ॅवॉर्डच्या फायनल लिस्टमध्ये नसेल तर तो माझ्यासाठी धक्का असेल, असे क्रिती या वेळी म्हणाली. बेस्ट अ‍ॅक्टर आणि बेस्ट अ‍ॅक्ट्रेसबद्दलही क्रिती एकदम कॉन्फिडन्ट दिसली. होय, क्रितीच्या मते, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दुसऱ्या कुणाला नाही तर आलिया भट्ट हिलाच मिळायला हवा. ‘उडता पंजाब’मध्ये आलियाने अप्रतिम काम केलेय आणि त्यामुळे ती या पुरस्काराची खरी दावेदार आहे, असे क्रितीचे मत आहे. आता उरली गोष्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची. तर हा पुरस्कार आपल्या बॉयफ्रेन्डला अर्थात सुशांत सिंह राजपूतला मिळावा, असे मत क्रितीने बोलून दाखवले आहे. महेन्द्रसिंह धोनीच्या बायोपिकसाठी सुशांतला बेस्ट अ‍ॅक्टरचा आयफा अ‍ॅवॉर्ड मिळावा, असे क्रितीने म्हटले आहे. म्हणजेच, बेस्ट अ‍ॅक्टरसाठी क्रितीचे वोट सुशांतच्या खात्यात गेले आहे.