Join us

पुन्हा एकदा साक्षी-रामची जमली जोडी!

By admin | Updated: April 17, 2017 04:12 IST

‘कहानी घर-घर की’ या मालिकेतून पार्वती बनत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री साक्षी तन्वरला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला आवडतात

‘कहानी घर-घर की’ या मालिकेतून पार्वती बनत घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री साक्षी तन्वरला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला आवडतात. २४ या सिरीजमध्येही शिवानी मलिक या भूमिकेला तिने योग्य न्याय दिला. "दंगल" सिनेमात मि. परफेक्शनिस्टसह ती झळकली. यातील साक्षीच्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले. आता पुन्हा "कर ले तू मोहब्बत’ या वेबसिरीजच्या माध्यमातून साक्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेविषयी बोलताना साक्षी म्हणाली, मला जितक्या आव्हानात्मक भूमिका करायला मिळतील त्या मी स्वीकारते. मुळात "दंगल" आधीच आधीच या वेबसिरीजसाठी मी होकार दिला होता. विशेष म्हणजे या वेबसिरीजमध्ये साक्षी "बडे अच्छे लगते है" या मालिकेनंतर पुन्हा एकदा राम कपूरसह झळकणार आहे. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री पाहणे मनोरंजनाची ट्रीटच म्हणावी लागेल.