Join us

पुन्हा एकदा ‘बाहुबली’ सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

भारताचा सर्वात मोठा चित्रपट ‘बाहुबली - द बिगिनिंग’ला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटामधील अद्भुत स्थळे, उत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स आणि आवेश व विश्वासघाताशी

भारताचा सर्वात मोठा चित्रपट ‘बाहुबली - द बिगिनिंग’ला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटामधील अद्भुत स्थळे, उत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स आणि आवेश व विश्वासघाताशी संबंधित कथा, निश्चितच भारतात यासारखा दुसरा कोणताच चित्रपट बनला नाही. बॉक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी केलेला हा चित्रपट पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर या मेगा ब्लॉकबस्टरचे प्रसारण रविवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता होणार आहे. प्रभास, राणा दग्गुबत्ती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी व रामया कृष्णन यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट बाहुबली हा एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेला ऐतिहासिक ड्रामा आहे. राजामौलीने भारतीय सिनेमाला काही सुपरहिट ब्लॉकबस्टर्स चित्रपट दिले आहेत. त्यापैकी या चित्रपटात ही दोन योद्धा भावांची काल्पनिक धाडसी कथा आहे, जे प्राचीन भारतीय साम्राज्याच्या संरक्षणाकरिता लढत आहेत. लूक्स ते पोशाख, लोकेशन्स ते गाणी, अशा उत्तम गोष्टींसह ‘बाहुबली - द बिगिनिंग’ निश्चितच सर्वांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट आहे.