Join us  

लक्ष्मीकांत बेर्डेंचा १९वा स्मृतीदिन, प्रिया बेर्डे भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 1:31 PM

Laxmikant Berde : मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसवले. आज या अभिनेत्याची १९वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या विनोदी शैलीने तब्बल दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसवले. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे झपाटलेला, धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, थरथराट, अफलातून आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. आज या अभिनेत्याची १९वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, १९वे पुण्यस्मरण. त्यांच्या या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, मामा खरंच एवढ्या लवकर तरी जायची काहीच गरज नव्हती. तुझ्या सारखा हसवणारे आता कोणीच नाही. अभिनेते जयवंत वाडकर यांनी लिहिले की, लक्ष्मीकांत खूप आठवण. दुसऱ्या युजरने लिहिले की, चांगली माणस नेहमी देवाला आवडतात. आणखी एका युजरने म्हटले की, तू इतका अद्भुत अभिनेता आहेस. तुझी आठवण येते.

दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी ते लॉटरीची तिकिटे विकत होते. त्यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. १९८४ साली आलेला चित्रपट लेक चालली सासरला, १९८५ साली धूमधडाका चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. १९८३-८४ मध्ये टूर टूर या मराठी नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर, ते आणि अभिनेता महेश कोठारे यांनी धूम धडाका (१९८४) आणि दे दना दन (१९८५) या चित्रपटात एकत्र काम केले. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले यात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदीशैली सर्वांना दाखवून दिली. ज्यामुळे ते एका रात्रीत लोकप्रिय झाले.

१६ डिसेंबर २००४ मध्ये अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

१९८९ साली सलमान खानबरोबर मैने प्यार किया या चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डेंनी हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. हम आपके हैं कौन, मेरे सपनो की राणी, आरझू, साजन, बेटा आणि अनारी हे त्यांचे हिंदी चित्रपट हिट ठरले. सर्वांना खळखळून हसविणार्‍या या विनोदाच्या बादशाहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या मराठी सिनेसृष्टीतील योगदानामुळे आजही ते रसिकांच्या स्मरणात कायम आहेत.

 

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डे