Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG...! बॉलिवूडची ही अभिनेत्री म्हणतेय, आता न्यूड सीन करू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 11:38 IST

बॉलिवूडमध्ये नुकतंच पदार्पण केलेली ही अभिनेत्री म्हणतेय, आता न्यूड सीन करू शकणार नाही

चित्रपट 'मलाल'मधून अभिनेत्री शर्मिन सहगल हिने बॉलिवू़डमध्ये पदार्पण केलं. तिचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला हवा तितका प्रतिसाद मिळत नाही आहे. मात्र शर्मिननं ऑनस्क्रीन न्यूड सीन्स करणार नसल्याचं सांगितलं आहे. शर्मिनला विचारण्यात आलं की बॉलिवूडमध्ये काम करताना तू काही अटी ठेवल्या आहेस का...? या प्रश्नाचं उत्तर देताना शर्मिन म्हणाली की, एक अभिनेत्री म्हणून मला खुप काही शिकायचं आहे त्यासाठी स्वत:ला मी नाही थांबवू शकत.

आज तकच्या रिपोर्टनुसार, शर्मिन म्हणाली की, 'जिथं पर्यंत आताची गोष्ट आहे तर मी स्क्रीनवर कोणताही सेक्स किंवा न्यूड सीन करू शकणार नाही. ती पुढे म्हणाली की, तसे सीन करण्यासाठी जास्त बॉडी कॉन्फिडंस हवा असतो. मला वाटतं की तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी, तुम्ही स्क्रीनर चांगले दिसत नाही किंवा जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल वा तुम्ही जो सीन करत आहात जो करताना तुम्ही स्वतला कनविन्स नाही आहात.'

शर्मिन संजय लीला भन्साली यांची भाची आहे आणि तिने जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान जाफरीसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

'मलाल' सिनेमात एका वाया गेलेल्या आणि शिक्षित मुलीची प्रेमकथा रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साली प्रोडक्शनने केली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करू शकला नाही. 

या चित्रपटाची कथा व सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल शर्मिन म्हणाली, 'मला सो कॉल्ड एक्सपेक्टेशन्सची चीड आहे. जेव्हा तुम्हाला कोणी पॉइंट आऊट करतो की तुम्हाला हे काम केलं नाही पाहिजे कारण तुम्ही मुलगी आहे. आम्हाला नेहमी सांगितलं जातं की तुम्ही शिव्या द्यायच्या नाहीत, जोरात ढेकर किंवा फार्ट करायचं नाही. लोकांसमोर असं बसायचं नाही, कारण तुम्ही मुली आहात.'

टॅग्स :संजय लीला भन्साळीजावेद जाफरी