Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG !कोण आहे 'ही' बाला जिने व्हॅलेंटाइन विकच्या निमित्ताने Sexy फोटो शेअर करण्याचा लावला सपाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 13:08 IST

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. त्यापूर्वी ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात होते. त्यामुळे रोज मायरा अशा प्रकारच्या शक्कल लढवत फोटो शेअर करत राहणार असेच दिसतंय.

प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटी काय करतील याचा नेम नाही. कधी कधी काही सेलिब्रिटींचे फोटो किंवा वागणं पाहून प्रसिद्धीसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे आपण गेल्या काही वर्षात अनुभवलं आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर वारंवार असे सेलिब्रिटींचे प्रसिद्धीचे स्टंट पाहायला मिळतात. अशात आणखीन एकीचे नाव सामिल होणार असेच दिसतेय. अध्ययन सुमनची गर्लफ्रेंड मायरा मिश्रा यांच्या अफेअरच्या बातम्या आता रोज वाचायला मिळतात. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून बऱ्याचदा ती अध्ययनसोबतचे फोटो शेअर करत असते. या फोटोमध्ये तिने स्वत:चा टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांना ''रोज डे''च्या शुभेच्छा दिल्या होत्या. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. त्यापूर्वी ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात होते. त्यामुळे रोज मायरा अशा प्रकारच्या शक्कल लढवत फोटो शेअर करत राहणार असेच दिसतंय. तुर्तास या फोटोला नेटीझन्सच्या अनेक भन्नाट प्रतिक्रीया येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही सेलिब्रिटी झगमगत्या चंदेरी दुनियेत संधी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होतात हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

 

अध्ययनने त्याच्या आणि मायराच्या नात्याबद्दल अद्याप मीडियात न बोलणेच पसंत केले असले तरीही सोशल मीडियावरील या दोघांचे फोटोवरून त्यांच्या नात्याविषयी आता सगळ्यांनाच कळले आहे. तुर्तास आता अध्ययन आणि मायरा त्यांच्या नात्याची कबुली देत लग्नबंधनात कधी अडकतात याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :अध्ययन सुमनशेखर सुमन