Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओम राऊत ‘चले साऊथ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 01:52 IST

ओम राऊत यांचा पहिला मराठी सिनेमा ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा रूपेरी पडद्यावर गाजला. पहिल्यावहिल्या सिनेमातल्या दिग्दर्शनानं ओम राऊत यांनी साऱ्यांची मनं जिंकली.

ओम राऊत यांचा पहिला मराठी सिनेमा ‘लोकमान्य एक युगपुरुष’ हा रूपेरी पडद्यावर गाजला. पहिल्यावहिल्या सिनेमातल्या दिग्दर्शनानं ओम राऊत यांनी साऱ्यांची मनं जिंकली. आता ओम राऊत यांच्या भविष्यातील योजनाविषयी त्यांच्याशी ‘सीएनएक्स’ने साधलेला हा संवाद...प्रश्न : ‘लोकमान्य एक युगपुरुष’ गाजला, त्यानंतर ओम राऊत पुढे काय करताहेत?मी एक दिग्दर्शक आहे. दिग्दर्शनात वेगवेगळे प्रयोग करणं हे दिग्दर्शकाचं काम. त्यामुळं मी दिग्दर्शनच एन्जॉय करत राहणार आहे.प्रश्न : ‘लोकमान्य एक युगपुरुष’ सिनेमानंतर कोणत्या सिनेमावर काम करत आहात का?लोकमान्य एक युगपुरुष या सिनेमानंतर आता एक दाक्षिणात्य सिनेमा करणार आहे. हा एक तमिळ सिनेमा असेल.प्रश्न : मराठमोळा दिग्दर्शक-दाक्षिणात्य सिनेमा हे कनेक्शन कसं आणि कसा असेल हा सिनेमा?सिनेमा आणि भाषेला कोणत्याही सीमा नसतात. त्यातच दक्षिणेत माझे अनेक मित्र आहेत; त्यामुळं काहीतरी वेगळा प्रयत्न करण्यासाठी तमिळ सिनेमा करत आहे.प्रश्न : कसा असेल हा तमिळ सिनेमा?या सिनेमाबाबत फारकाही आता सांगता येणार नाही. मात्र हा सिनेमा एक ‘अ‍ॅक्शनपट’ असेल. या सिनेमाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल एवढंच मी सांगू शकेन.प्रश्न : सिनेमातील कलाकाराबद्दल काय सांगाल आणि सिनेमाची तयारी कुठवर आली आहे?या सिनेमातील सगळे कलाकार हे तमिळ असतील; तसंच या सिनेमाची पूर्ण स्क्रीप्ट तयार आहे. विविध भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा विचार असला तरी सुरुवातीला तमिळमध्येच हा सिनेमा रीलीज होईल.प्रश्न : मराठीत ओम राऊत बायोपिकच करणार की इतर विषयही हाताळणार आहेत?बायोपिकच करणार असं नाही. मला जास्त सिनेमे करायचे नाहीत. जे करायचं त्यात अगदी परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करणार आहे.