मुंबई : भारदस्त आवाज, पल्लेदार संवादफेक आणि कसदार अभिनयाने रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ आपली छाप उमटविणारा ओम पुरी नावाचा चंदेरी दुनियेचा लखलखता तारा शुक्रवारी अचानक काळाच्या पडद्याआड लुप्त झाला.शुक्रवारी सकाळी हृदयविकाराने ओम पुरी यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नंदिता आणि मुलगा ईशान असा परिवार आहे.‘घाशीराम कोतवाल’ या नाटकावर आधारित मराठी चित्रपटातून सुरू केलेल्या चंदेरी प्रवासात त्यांनी बॉलीवूडसोबतच हॉलीवूडपर्यंतचा टप्पा गाठला. देखण्या व्यक्तिमत्त्वाचे वरदान नसताना कसदार अभिनयाच्या जोरावर अर्धसत्य, आक्रोश यांसारखे चित्रपट, तमस, भारत एक खोज, कक्काजी कहीन आदी मालिकांमुळे ते घराघरांत पोहोचले.
ओम पुरी कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 06:42 IST