Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता खलनायक बनणार प्रभुदेवा

By admin | Updated: November 12, 2014 00:23 IST

बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभुदेवा त्याच्या आगामी चित्रपटात एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘

बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभुदेवा त्याच्या आगामी चित्रपटात एका खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘एनीबडी कॅन डान्स’ या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये तो खलनायकाच्या रूपात दिसणार आहे. कोरिओग्राफर रेमो डिसुजाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सिक्वलमध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसतील. सिक्वलमध्ये प्रभुदेवा आणि लॉरेन गॉटलिबही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागातही या दोघांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात प्रभुदेवाने एका डान्स गुरूची भूमिका साकारली होती. यावेळी मात्र तो खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.