आ मिर खानच्या पीके या चित्रपटाच्या न्यूड पोस्टरवरून अनेक वाद झाले. त्यानंतर या चित्रपटाचे अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर्स रिलीज झाले असून या नव्या पोस्टर्समध्ये आमिरसोबत अनुष्का शर्माही दिसत आहे. काही पोस्टर्समध्ये अनुष्काने आमिरसारखी ड्रेसिंग केली आहे. एका पोस्टरमध्ये ती पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे; पण हा गणवेश ओव्हरसाईज्ड दिसत आहे. अनुष्काचा परिचय करून देताना आमिरने टि¦ट केले आहे की, ‘ई देखा.. हमार जग्गू.. टिरान्जिस्टर के साथ.’ चित्रपटात अनुष्काच्या पात्रचे नाव जगत जननी असे आहे. अनुष्काने टि¦ट केले आहे की, ‘कन्फ्युज झालात. मी पीके नाही. माङो नाव आहे जगत जननी. हो जगत जननी.’ नव्या पोस्टर्समध्ये आमिर एका दुचाकीवर अनुष्काच्या मागे बसला आहे, दुस:या पोस्टरमध्ये ते दोघे तुरुगांत आहेत.