Join us

आता आमिर बनणार रोबोट

By admin | Updated: November 15, 2014 23:08 IST

दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘रोबोट’ या चित्रपटाच्या सिक्वलसाठी आमिर खानने होकार दिल्याची बातमी आहे.

दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘रोबोट’ या चित्रपटाच्या सिक्वलसाठी आमिर खानने होकार दिल्याची बातमी आहे. 2क्1क् मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आता या सिक्वलमध्ये आमिर रोबोटच्या भूमिकेत दिसणार आहे. सिक्वलचे दिग्दर्शनही शंकर करणार आहेत. एखाद्या चित्रपटाला होकार देण्यापूर्वी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर दहा वेळा विचार करणा:या लोकांपैकी आमिर एक आहे. एखाद्या चित्रपटाला होकार दिला, तर भूमिकेत स्वत:ला झोकून देणा:या आमिरला म्हणूनच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. लवकरच आमिरचा पीके या चित्रपटातील वेगळाच अवतार पाहायला मिळणार आहे. त्याचा रोबोट अवतार पाहायलाही चाहते उत्सुक आहेत.