Join us

काहीही हं श्री !...अभिनेता शशांक केतकरचा साखरपुडा

By admin | Updated: April 9, 2017 15:55 IST

"होणार सून मी ह्या घरची" या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास सज्ज

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 -"होणार सून मी ह्या घरची" या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची कळी खुलली आहे. शशांक पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास सज्ज आहे.  
 
शशांक केतकरचा नुकताच प्रियंका ढवळे नावाच्या तरूणीसोबत साखपुडा झाला. प्रियंका वकील असल्याची माहिती आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर दोघांच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. 
 
मध्यंतरी तेजश्री प्रधान आयुष्यातून गेल्यानंतर पुन्हा एकदा शशांकच्या आयुष्यात प्रेमाची पालवी फुलली असल्याची चर्चा रंगली होती. त्याला कारण ठरलं होतं  शशांकने त्याच्या फेसबुकवर अपलोड केलेला प्रियंकासोबतचा फोटो. त्यामुळे शशांक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे बोलले जात होते. पण शशांकने बरेच दिवस त्यावर मौन ठेवल्यानंतर आज अमृताने पोस्ट केलेल्या फोटोंमुळे शशांक आणि प्रियंकाचा साखरपुडा झाल्याचं सर्वश्रूत झालं.
 
दोन वर्षांपूर्वी  8 फेब्रुवारी 2014 रोजी शशांक केतकरचं ‘होणार सून..’ मालिकेतील त्याची सहकलाकार तेजश्री प्रधानशी पुण्यात लग्न झालं होतं. पण वर्षभरातच त्यांच्यात मतभेद झाले आणि दोघं वेगळं राहायला लागले.