Join us

‘रईस’ अडचणीत

By admin | Updated: February 6, 2016 02:33 IST

विश्व हिंदू परिषद आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी ‘रईस’च्या शूटिंगला विरोध दर्शवला आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे शाहरूख खानला ‘दिलवाले’च्या बॉक्स आॅफिसवरील कमाईत फटका बसला होता.

विश्व हिंदू परिषद आणि उजव्या विचारांच्या संघटनांनी ‘रईस’च्या शूटिंगला विरोध दर्शवला आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे शाहरूख खानला ‘दिलवाले’च्या बॉक्स आॅफिसवरील कमाईत फटका बसला होता. शाहरूखचे ग्रह अजूनही स्थिर झालेले नाहीत. त्याच्या आगामी ‘रईस’ चित्रपटालाही आता विरोध सुरू झाला आहे. ‘रईस’ चित्रपटात १९८० चा गुजरात दाखवायचा आहे. त्यासाठी शाहरूख आणि त्याच्या टीमने भूजमध्ये शूटिंग करायचे ठरवले आहे. यासाठी शासकीय परवानग्याही त्यांनी घेतल्या आहेत. मात्र गुजरातमध्ये ‘रईस’चे १५ दिवसांचे शूटिंग लावण्यात आले आहे. या शूटिंगलाच आता विरोध सुरू झाला आहे. पण विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. त्यात ही परवानगी नाकारावी, अशी विनंतीही केली आहे. एकंदरीतच असहिष्णुतेच्या संबंधित भाष्याचा फटका शाहरूखला ‘दिलवाले’मध्ये बसलाच आहे, पण आता ‘रईस’लाही हा फटका बसू शकतो असे वातावरण तयार झाले आहे. ‘दिलवाले’च्या प्रदर्शनाच्या वेळीही या संघटनांनी विरोध केला होता. शाहरूखची पोस्टर्स जाळण्यात आली होती.