Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनाक्षीसोबत रोमान्स नाही : अजरुन

By admin | Updated: October 18, 2014 23:48 IST

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अजरुन कपूर ‘तेवर’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अजरुन कपूर ‘तेवर’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली असून ते आता बराचसा वेळ एकत्र घालवत असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्रने म्हटले आहे. या वृत्तपत्रनुसार अजरुन आणि सोनाक्षी यांच्यात जवळीक खूप वाढली असून या दोघांचे कुटुंबीय आता या दोघांच्या लग्नाचा विचार करीत आहेत. या प्रकरणी आता अजरुनने त्याचे मौन तोडले आहे. सोनाक्षीला डेट करीत नसल्याचे त्याचे म्हणणो आहे. त्याने सांगितले की,  आम्ही एकाच शाळेत शिकलो; पण रोमान्ससारखे काहीही नाही.’ सोनाक्षी आणि अजरुनच्या ‘तेवर’ या चित्रपटाची निर्मिती अजरुनचे काका संजय कपूर करीत आहेत.