‘एक दुजे के वास्ते’ या मालिकेत सुमनची भूमिका साकारणारी निकिता दत्ता सध्या प्रचंड आजारी आहे. निकिताला कित्येक दिवसांपासून ताप आहे. पण तो काही केल्या उतरत नसल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ती रुग्णालयात आहे. तिचा ताप सध्या उतरला असला तरी तिला चांगलाच वीकनेस आला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. निकिताला आणखी काही दिवस तरी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. निकिताला संपूर्ण बरे वाटल्याशिवाय तिने चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
निकिता पडली आजारी
By admin | Updated: July 29, 2016 02:20 IST