Join us
Daily Top 2Weekly Top 5

निखील राऊतचा हटके लूक!

By admin | Updated: February 25, 2017 02:50 IST

प्रत्येक कलाकारांसाठी फोटोसेशन हा जिव्हाळयाचा विषय असतो. कारण फोटोसेशनच्या माध्यमातून कलाकारांना आपण ही वेगवेगळया लूकमधील

प्रत्येक कलाकारांसाठी फोटोसेशन हा जिव्हाळयाचा विषय असतो. कारण फोटोसेशनच्या माध्यमातून कलाकारांना आपण ही वेगवेगळया लूकमधील भूमिकेत परफेक्ट बसू शकतो हा त्यामागचा हेतू असतो. त्यामुळे कलाकार हे ठराविक दिवसानंतर फोटोसेशन करत असल्याचे पाहायला मिळत असतात. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता निखील राऊत याने नुकतेच हटके फोटोसेशन केले असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहेत. कारण त्याने त्याचे हे झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. त्याच्या या फोटोला सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर त्याने हे फोटोसेशन सायकलवर बसून केले आहेत. म्हणून त्याने आपल्या या फोटोसेशनच्या माध्यमातून सायकल ही फिटनेसविषयीचे प्रेरणास्थान आहे अशी पोस्टदेखील केली आहे. मात्र त्याचे हे फोटोसेशन कोणत्या चित्रपटासाठी आहेत का अदयापदेखील कळाले नाही. पण काहे दिया परदेस या मालिकेतील विकीला प्रेक्षक आज ही विसरले नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या विकीचे हे फोटो पाहता त्याचे चाहते नक्कीच खूश झाले आहेत.