Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डार्लिंग'च्या प्रेमात निखिल चव्हाण, म्हणतोय - 'आपण तिचा ओन्ली किंग!'

By तेजल गावडे | Updated: November 10, 2020 16:09 IST

लागीर झालं जी या मालिकेद्वारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला निखिल चव्हाण एका नव्या रूपात भेटीला येणार आहे.

लागीर झालं जी या मालिकेद्वारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला निखिल चव्हाण एका नव्या रूपात आणि नव्या शैलीत आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निखिल सध्या ‘डार्लिंग’च्या प्रेमात आहे. 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘डार्लिंग’ या आगामी सिनेमात निखिल एका नव्या रूपात दिसणार आहे. 

निखिल चव्हाणने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आरं!! तुझ्या वाहिनीसाठी घेतलीये बघं एकदम सॉलिड रिंग, ती राणी आपल्या काळजाची, आपण तिचा ओन्ली किंग...निखिलने नेहमीच मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या वाटयाला आलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. याच कारणामुळे आज तो घराघरात लोकप्रिय आहे. याचाच फायदा निखिलला ‘डार्लिंग’ या सिनेमातही होणार यात शंका नाही.

या सिनेमात निखिलची ‘डार्लिंग’ बनलीय रितिका श्रोत्री. असाच अंदाज सध्या तरी बांधला जातो आहे. खरे काय ते सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे. त्याशिवाय यात प्रथमेश परबही मुख्य भूमिकेत असल्याने उत्सुकता वाढली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आजच्या घडीचे आघाडीचे तीन कलाकार ‘डार्लिंग’मध्ये एकत्र आल्याने सिनेमात काहीतरी अचाट पहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  

निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही.  जे. शलाका आणि निखील खजिनदार यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. हा चित्रपट ७ जानेवारी २०२१ला ‘डार्लिंग’ प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :निखील चव्हाणप्रथमेश परब