इलू-इलू गर्ल मनीषा कोईराला लवकरच एक मुलगी दत्तक घेणार आहे. कर्करोगाशी यशस्वी लढा दिल्यानंतर मनीषा आता आई बनण्यासाठी उत्सुक आहे. तिने 2क्1क् मध्ये लग्न केले होते; पण ते फारसे यशस्वी ठरू शकले नाही. 2क्12 मध्ये तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर मनीषाला कर्करोगाचे निदान झाले होते. परदेशात उपचार घेऊन मनीषा वर्षभरापूर्वीच भारतात परतली आहे. मनीषाला आता एका मुलीला दत्तक घ्यायचे आहे. तिने काही वर्षापूर्वीच मुलगी दत्तक घेण्याची योजना बनवली होती; पण कर्करोग झाल्याने तिला ही योजना पुढे ढकलावी लागली. कर्करोगातून बरी झाल्यानंतर तीन वर्षानी ती मुलगी दत्तक घेऊ शकते, असा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला आहे. ही तीन वर्षाची मर्यादा पुढील वर्षी संपणार आहे. त्यामुळे ती पुढील वर्षात मुलगी दत्तक घेणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}