Join us

पुढील वर्षी जॉन असेल ‘बिझी’

By admin | Updated: October 27, 2014 00:17 IST

चालू वर्षात अभिनेता जॉन अब्राहमचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही; परंतु २०१४ ची भरपाई तो २०१५ या वर्षी करणार आहे. पुढील वर्षी त्याचे तीन चित्रपट रिलीज होणार आहेत

चालू वर्षात अभिनेता जॉन अब्राहमचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही; परंतु २०१४ ची भरपाई तो २०१५ या वर्षी करणार आहे. पुढील वर्षी त्याचे तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. जॉनच्या वर्षाची सुरुवात ‘वेलकम बॅक‘ पासून होईल. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात श्रुती हसन त्याची नायिका असेल. त्यानंतर ‘रॉकी हँडसम’मधून जॉनचे दर्शन घडणार आहे. सुजित सरकरच्या ‘१९११’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या जॉन व्यस्त आहे. हा चित्रपटदेखील २०१५ मध्ये रिलीज होईल. ‘१९११’ रिलीज झाल्यानंतर जॉन लगेचच ‘मुंबई सागा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट २०१६ च्या सुरुवातीला रिलीज होण्याची शक्यता आहे.